Pune Crime | मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू; वानवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा जलतरण तलावाच्या पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.20) दुपारी दोनच्या सुमारास पुण्यातील (Pune Crime) वानवडी येथील बापूसाहेब केदारी जलतरण तलावात (Bapusaheb Kedari Swimming Pool Wanwadi) घडली आहे.

 

गणेश पुंडलीक पाटोळे Ganesh Pundalik Patole (वय – 17 रा. गल्ली क्रमांक 7, सरवदे वस्ती मागे, साठे नगर, महमदवाडी – Mahmadwadi) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. गणेश व त्याचे मित्र रेहान, अजय असे तिघेजण रविवारी दुपारी वानवडीतील शिवरकर मार्गावर असलेल्या महापालिकेच्या (Municipal Corporation) जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते. रेहानला पोहता येत नसल्याने काहीवेळ तो पाण्यात थांबून बाहेर आला. तर अजय आणि गणेश हे नव्यानेच पोहायला शिकल्याने ते खोल पाण्यात उतरून पोहत होते. (Pune Crime)

 

दरम्यान, जलतरण तलावातील पाणी गढूळ झाल्याने अजयला त्रास होऊ लागल्याने तो बाहेर आला. त्याने कपडे घातले. बराचवेळ झाला तरी गणेश पाण्याबाहेर आला नाही. त्याचा जलतरण तलावात शोध घेऊनही आढळला नाही. त्यामुळे अजय आणि रेहान यांनी तातडीने तेथील जीवरक्षकांना (Lifeguard) याबाबत सांगितले. त्यांनी काही वेळाने जलतरण तलावामध्ये शोध घेतला. त्यांनाही गणेश आढळून आला नाही.

अखेर गणेशचा शोध घेण्यासाठी तलावातील पाणी कमी करण्यात आले.
त्यावेळी गणेश पाण्यामध्ये बुडाल्याचे दिसून आले. अजय, रेहान व जीवरक्षकांनी त्याच्यावर प्रथमोपचार करुन त्याला तातडीने रुग्णालयात नेले.
डॉक्टरांनी गणेशला तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime Ganesh Pundalik Patole drowned while swimming water of Bapusaheb Kedari Swimming Pool Wanwadi pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा