Pune Crime | मुलीच्या फोनने मदतीला गेला आणि टोळक्याने धु-धु धुतला; बोपदेव घाटात भरदिवसा घडलेली घटना

पुणे : Pune Crime | पुरुषांमध्ये स्त्रीदाक्षिणात्य मोठ्या प्रमाणावर असते. एखादी मुलगी अडचणीत असेल तर तिच्या मदतीसाठी धावणार्‍यांची संख्या कमी नसते. अशाच एका मुलीने केलेल्या फोनवरुन मदतीला धावलेल्या तरुणाला टोळक्याने धु-धु धुतला. या मारहाणीत (Pune Crime) त्याच्या करंगळीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. बोपदेव घाटात (Bopdev Ghat) अर्ध्यावर एस वळणावर शुक्रवारी दुपारी 2 वाजता हा प्रकार घडला.

याप्रकरणी कासीम इस्माईल शेख (वय 23, रा. आश्रफ नगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात
(Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन मोहम्मद शेख, समीर शेख, फैज शेख, इम्रान शेख, इन्नू व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासीम शेख हे एका गॅरेजमध्ये काम करतात. मोहम्मद शेख व समीर शेख यांनी एका मुलीच्या मार्फत फोन केला व तिची अ‍ॅक्टीवा गाडी बंद पडली असून दुरुस्तीसाठी बोपदेव घाटात बोलावून घेतले. या फोनवरुन दिलेल्या ठिकाणी  मदतीसाठी शेख गेले. त्यावेळी तेथे हे टोळके त्याची वाटच पहात होते. मोहम्मद शेख  हा कासीमला म्हणाला की ‘‘उस दिन मेरे को सळी से मारता क्या कितने दिन भागेगा आया ना अभी अब जाके बता’’ असे म्हणून त्याला बांबुने दोन्ही पायावर, उजवे हातावर, कमरेवर, डोक्यात मारुन जबर जखमी केले. या मारहाणीत त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. आरोपींनी जाताना त्याला ‘‘तू किधर कंप्लेट करेगा तो तेरे को गायब करेंगे’’ अशी धमकी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! लवकरच खात्यात येणार मोठी रक्कम, जाणून घ्या डिटेल

Central Government | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नोकरी गमावणार्‍यांना 2022 पर्यंत मिळेल PF

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | gang of youth beating boy in bopdev ghat area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update