Pune Crime | ग्राहकांनो गॅस मोजूनच घ्या ! घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून घेणारी टोळी गजाआड; 9 जणांना अटक 2 फरार (व्हिडीओ)

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील (Pune Crime) दापोडीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून (domestic gas cylinder) गॅस कडून तो हॉटेल व्यावसायिकांना विकणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने (Pimpri Chinchwad Social Security Squad) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकाला त्यावेळी आरोपीला गॅस रिफलिंग (Gas refilling) करताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी 12 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 9 जणांना अटक (Arrest) केली आहे. या कारवाईत (Pune Crime) पोलिसांनी 6 लाख 97 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गॅस रिफीलींग करणारा नागेद्रपाल योगेंद्रपाल सिंह (वय-28 रा. दापोडी), छोटु श्रीभगवान बघेल (वय-19 रा. दापोडी), कामगार करतार छोटेलाल सिंह (वय-26 रा. दापोडी), टेम्पो चालक राजेंद्रसिंह जोरसिंग सिंह (वय-40 रा. दापोडी), हरिकांत रौतान सिंह तौमर (वय-33), हरिशंकर धनीराम सिंह (वय-22), आकाश शेर सिंह (वय-19), देविदास तुळशीराम बिरादार (वय-52 रा. शितोळे नगर, सांगवी) यांना अटक करण्यात आली आहे. तर बंटु सिंह (वय-30 पूर्ण नाव माहित नाही), वसंत खेमाजी काट (वय 65) हे फरार असून कांकरीया एचपी गॅस एजन्सी, वंदना भारत गॅस एजन्सी, देगलुरकर भारत गॅस एजन्सीच्या मालकांवर भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) गुन्हे (Pune Crime) दाखल करण्यात आले आहेत.

 

पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये देगलूरकर गॅस एजेंसी (Degalurkar Gas Agency), वंदना गॅस एजन्सी (Vandana Gas Agency), कांकरिया गॅस एजन्सी (Kankaria Gas Agency)
येथील घरगुती गॅस सिलेंडरमधून 2 किलो गॅस काढून घेतला जात होता.
मात्र, याची माहिती संबंधित गॅस चालक मालकांना आरोपींनी होऊ दिली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील वसंत काटे यांच्या मोकळ्या जागेत बंटु सिंह हा देगलुरकर गॅस एजन्सी, वंदना गॅस एजन्सी, कांकरिया गॅस एजन्सीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मिळवून देत होता. तर देविदास बिरादार हा विविध हॉटलला गॅस विक्री करत होता. अशा प्रकारे दोघांचा अवैध गॅस विक्रीचा धंदा सुरु होता.
या प्रकरणाची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे (API Ashok Dongre) यांना माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वसंत काटे यांच्या मोकळ्या जागेत छपा टाकला असता त्याठिकाणी गॅस रिफलिंग केली जात असल्याचे समोर आलं.
या कारवाईत पोलिसांनी 8 हजार 240 रुपयांची रोख रक्कम, 3 लाख 44 हजार 754 रुपयांच्या गॅस सिलेंडरच्या टाक्या व साहित्य, 3 लाख 25 हजार रुपये किमतीचे 6 तिनचाकी अ‍ॅपे टेम्पो,
20 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 6 लाख 97 हजार 994 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

या कारवाईनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. त्यांचे घरी गॅस एजन्सी कडून गॅस सिलेंडर वितरीत होताना त्याचे वजन करुन घ्यावे.
जणेकरुन आपली गॅस एजन्सी मार्फत गॅस सिलेंडर वितरीत करणाऱ्या लोकांकडून फसवणूक होणार नाही.
टाळाटाळ केल्यास संबंधित एजन्सीला त्याची तक्रार करा, असे आवाहन सामाजिक सुरक्षा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Additional Commissioner of Police Dr. Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त आनंद भोईटे (DCP Anand Bhoite), सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amritkar), सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे (PSI Pradipsingh Sisode), धैर्यशिल सोळंके (PSI Dhairyasheel Solanke), पोलीस अंमलदार विजय कांबळे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, जालिंदर गारे, अनिल महाजन, मारुती करचुंडे संगिता जाधव, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, सोनाली माने यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | gang that removed the gas from the domestic gas cylinder was arrested in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Health Tips | रिसर्चमध्ये खुलासा ! प्रत्येक गोष्टीवर रडण्याने कमी होतो लठ्ठपणा, तणावापासून दूर राहतो मनुष्य

Immunity | इम्युनिटी वाढवणे आणि थकवा घालवण्यासाठी आहारात समाविष्ट करा ‘हे’ 5 आयर्नयुक्त फूड्स; जाणून घ्या

FSSAI | ग्राहकांना खराब अन्न खाऊ घालणे रेस्टॉरंट, ढाबा चालकांना पडणार महागात ! 1 ऑक्टोबरपासून बिलावर 14 अंकी रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक