Pune Crime | मोबाईल टॉवरच्या बीटीएस बॉक्समधून बेस बँड मशीनची चोरी करणारी टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोबाईल टॉवरच्या बीटीएस बॉक्समधून (Mobile Tower BTS Box) बेस बँड मशीनची (Base Band Machine) चोरी (Stealing) करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला जेजुरी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन लाख रुपये किमतीचे 2 बेस बँड मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी एका आरोपीला चोरी करताना रंगेहात पकडले तर त्याच्या दोन साथिदारांना पाठलाग करुन (Pune Crime) पकडण्यात आले.

 

सद्दाम युसूफ खान Saddam Yusuf Khan (वय – 29 रा. चिंचोशी, ता. खेड, मुळ रा. धवलपुर ता. धवलपुर, राजस्थान), नितीन साहेबाराव ओव्हाळ Nitin Sahebarao Oval (वय – 37 रा. चिंचोशी, ता. खेड), दत्तात्रय महादू मोहिते Dattatraya Mahadu Mohite (वय – 46 मोहितेवाडी, शेळ पिंपळगाव ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत संजय चंद्रभुषण पाठक Sanjay Chandrabhushan Pathak (वय – 43) रा. दिघी, पुणे) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात (Jejuri Police Station) फिर्याद दिली आहे. आरोपींवर आयपीसी 379, 34 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हि कारवाई सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील शिवरी गावच्या हद्दीत केली. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील शिवरी गावच्या हद्दीत इंडस मेन्टन्स (Indus Maintenance), बी फोर एस सोल्युशन प्रा.लि. (B Four S Solutions Pvt. Ltd.) या कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपी हे टॉवरच्या बीटीएस बॉक्समधून एक लाख रुपये किमतीची इरेक्सन कंपनीचे बेस बँड 6630 ही मशिन चोरी करत होते. त्यावेळी मोबाईल टॉवरचा अलर्ट आलाराम वाजला. त्यामुळे फिर्यादी आणि इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले.

फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सद्दाम युसूफ खान याला चोरी करताना रंगेहात पकडले. तर त्याचे इतर दोन साथिदार पिकअप (एमएच 14 जीडी 1922) मधून पळून गेले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) व फिर्यादी यांनी पाठलाग करुन पकडले. आरोपींकडून चोरी केलेली मशीन आणि पिकअप वाहन जप्त केले. तसेच पिकअपमध्ये असलेली आणखी एका मोबाइल टॉवरची मशीन पोलिसांनी जप्त केली.

 

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी कान्हे फाटा, चिंचवड, चाकण, लोहगाव व इतर 11 ठिकाणी मोबाईल टॉवर बेस मशीन चोरल्याची कबुली दिली आहे.
तसेच चोरलेला मुद्देमाल विश्रांतवाडी येथील कदम नावाच्या भंगारवाल्यास विकल्याचे सांगितले.
यापुर्वी देखील जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल असून त्या अनुषंगाने पोलीस आरोपींकडे तपास करत आहेत.
याशिवाय आरोपींकडे सापडलेले पिकअप वाहन कोणाच्या नावावर आहे किंवा चोरीचे आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत.

 

दरम्यान, इंडस टॉवर्स या कंपनीचे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी टॉवर आहेत.
या टॉवरमधून चोरट्यांनी कार्डस व पॉवर केबल चोरी केली आहे. याबाबत कंपनीने 44 गुन्हे दाखल केले आहेत.
मात्र अद्याप एकाही गुन्ह्याचा तपास होऊ शकला नाही.
कंपनीने दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (Pune Rural Police SP) यांना निवेदन दिले आहे.

 

 

 

Web Title :- Pune Crime | Gang who steal base band machine from mobile towers BTS box arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा