Pune Crime | बोपदेव घाटात दरोडा टाकून तरुणांना लुटणारे टोळके जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बोपदेव घाटात सायंकाळच्या वेळी पुण्याकडे येणाऱ्या दोघा तरुणांना मारहाण करुन टोळक्याने जबरदस्तीने त्यांच्या पाकीटातील रोख रक्कम व इतर कागदपत्रे चोरुन नेली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) दरोड्याचा गुन्हा दाखल करुन पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

 

विक्रांत गुरुदेव गारगोटे (वय २७, रा. आनंदी सोसायटी, पाटील इस्टेट, वाडा रोड, राजगुरुनगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील हे ११ नोव्हेबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मित्र निखिल असे बोपदेव घाटातून पुण्याकडे येत होते. त्यावेळी दोन मोटारसायकलवरुन पाच जण आले. त्यांनी गारगोटे व निखिल यांना कोयत्याने मारहाण केली. निखिल याच्या पाकीटातून २ हजार २० रुपये व इतर कागदपत्रे जबरदस्तीने चोरुन नेली. पोलिसांनी पाच जण अल्पवयीन मुलांना पकडले असून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Gangs robbing youths in Bopdev Ghat kondhwa police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा