Pune Crime | गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक, मोक्का गुन्ह्यात 4 वर्षापासून होता फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ (Gangster Nilesh Ghaiwal) टोळीतील मोक्का (MCOCA Action) Mokka गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 3 (Pune Police Crime Branch) च्या पथकाने अटक (Arrest) केली आहे. दिपक रमेश आमले Deepak Ramesh Amle (वय-29 रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, आशिष गार्डन शेजारी, कोथरूड, सध्या रा. नांनज, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई रविवारी (दि.20) अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) जामखेड तालुक्यातील नांनज (Nannaj Jamkhed Taluka) याठिकाणी केली. (Pune Crime)

 

आरोपी दिपक आमले याच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) मोक्कांतर्गत गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. चार वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, गुन्हे शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी दिपक आमले हा नांनज येथील शेतात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीदम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
पोलीस अंमलदार टेकावडे व पडवाळ यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Gangster Nilesh Ghaiwal gang accused arrested by Pune Police crime branch, had been absconding for 4 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | इंदापूरमधील शासकीय गोडाऊनजवळ राहणार्‍या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

 

Pune Corona Update | दिलासादायक! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 132 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

PMC JICA Project | मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाची कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण, खासदार गिरीश बापट यांच्या पाठपुराव्यास मोठे यश

 

Corporator Chanda Lokhande | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दुसरा धक्का ! शहर नेतृत्वावर नाराज होत नगरसेविका चंदा लोखंडे यांचा राजीनामा