Pune Crime | ‘गुंडगिरी’चा शेवट ‘गुंडगिरी’तूनच ! संतोष जगतापचा खून 2011 च्या मर्डरच्या बदल्यासाठी? जाणून घ्या संपुर्ण स्टोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राहु (rahu) येथील वाळू व्यावसायिक (sand businessman) संतोष संपतराव जगताप (Santosh Sampatrao Jagtap) याने गुंडगिरी सोडून सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र, पूर्वी केलेले कृत्य कधीही पाठ सोडत नाहीत, याचा प्रत्यय या घटनेवरून आला आहे. 2011 मध्ये राहू वाळू व्यवसायातून केलेल्या हत्याकांडातून संतोष जगताप याचा निर्घुण खून (Murder) करण्यात आला (Pune Crime) आहे. अतिशय नियोजनबद्धरितीने हा हल्ला झाल्याचे दिसून (Pune Crime) येते. नेहमी बाउन्सर व चारचाकी गाड्यांचा ताफा व कार्यकर्त्यांचा गराड्यात असलेल्या संतोष जगताप याला हल्लेखोरांनी नेमका एकटा असताना गाठले आणि त्याच्यावर गोळीबार (Firing Case) करुन संपविले.

 

अप्पा लोंढे (appa londhe) याने दौंड (Daund), बारामती (Baramati) तालुक्यात वाळू तस्करीतून आपले साम्राज्य पसरविले होते. त्यातून टोळी तयार करुन त्याने तालुक्यामध्ये दहशत निर्माण केली होती. त्यातूनच त्याला मॉर्निंग वॉकला गेला असताना हल्लेखोरांनी गाठून संपविला होता. त्याच प्रमाणे गुंडगिरीतून संतोष जगताप याने दुश्मन तयार केले होते. त्यातूनच त्याचा ‘खात्मा’ (Pune Crime) झाला.

 

Pune Crime | पुण्यात भरदिवसा बेछुट गोळीबार; वाळू व्यावसायिक संतोष जगतापसह दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक (व्हिडीओ)

 

संतोष जगताप व त्याच्या गुंडांनी बेकायदा वाळू उपशावरुन 2011 मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे (Ganesh Sonawane) व त्यांचे चुलत भाऊ रमेश सोनवणे (Ramesh Sonawane) यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर संतोष जगताप याने 2018 मध्ये यवत (yavat murder case) येथेही एकाचा खून केला होता. त्यानंतर त्याच्यावर मोक्का (MCOCA) Mokka लावण्यात आला होता. अप्पा लोंढे याच्याबरोबर एका गुन्ह्यात तोही आरोपी होता. 2019 मध्ये मोक्कामधून तो जामीनावर बाहेर आला होता.

 

जगताप याचे वडिल संपतराव जगताप हे राहूचे पोलीस पाटील (Police Patil) होते. आई प्रतिभा जगताप या दौंड तालुका कृषी उत्पन बाजार समितीच्या माजी सभापती होत्या. राहू येथे प्रगतीशील शेतकरी म्हणून जगताप कुटुंबाला ओळखले जाते. जामीनावर बाहेर आल्याने त्याने सामाजिक क्षेत्रात आपला वावर वाढविला होता. केडगाव, बोरीपारधी, राहू परिसरात त्याची दहशत होती. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने शत्रुत्व कमी करुन सामाजिक कामात सहभाग वाढविला होता. तरीही त्याला आपल्या जीवाची नेहमीच भिती वाटत असे. त्यातून तो सुरक्षारक्षक व कार्यकर्त्यांच्या गराड्यात रहात असे.

शुक्रवारी केडगाव येथील एका कापड दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त संतोष तेथे प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.
दुकानाच्या वर्धापन दिनाचा केक संतोष जगताप याच्या हस्ते कापण्यात आला. त्यानंतर त्याने कुंभार कॉम्प्लेक्समधील एका दुकानाला भेट दिली.
त्यानंतर केडगावमधील एका घरी तो जाऊन नंतर उरुळीच्या (uruli kanchan) दिशेने गेला.
जगताप याच्याबरोबर दोन बाऊन्सर (bodyguard) आणि चारचाकी गाड्यांचा ताफा व कार्यकर्त्यांचा गराडा नेहमी असायचा.
परंतु, काल त्याच्याबरोबर दोनच बाऊन्सर होते. परिसरातमध्ये एका ठिकाणी ते चहा पिण्यासाठी थांबले असताना हल्लेखोरांनी ही संधी साधली आणि त्याचा गेम (Pune Crime) केला.

 

लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले केले आहेत.
संतोष जगतापचा अंगरक्षक (bodyguard) शैलेंद्रसिंग यांच्या फिर्यादीवरुन स्वागत बापू खैरे Swagat Bapu Khaire (मयत)
आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

तर पोलीस उपनिरीक्षक जयंत हंचाटे (PSI Jayant Hunchate) यांच्या फिर्यादीवरुन संतोष जगताप
याचा अंगरक्षक शैलेंद्रसिंह (Bodyguard Shailendra Singh) याच्यावर स्वागत बापू खैरे याच्या खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या गोळीबारात तोही जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
संतोष जगतापची गेम झाल्यानंतर गुंडगिरीचा शेवट हा गुंडगिरीतूनच झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Gangwar in pune santosh sampatrao jagtap murder case story loni kalbhor police aapa londhe gang

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळील ‘सेल्फी पॉईंट’ येथे भीषण अपघात; 3 ठार तर 12 जखमी, दोघे चिंताजनक (व्हिडिओ)

Men’s Health | पुरुषांनी पुरूषांनी ‘या’ 7 गोष्टींचं सेवन आवश्य करावं; टेस्टोस्टेरोन लेव्हल वाढल्याने सेक्स लाईफ चांगली, जाणून घ्या

Pune News | कोरोना काळात मनोबल ढासळत असताना मिळालेली शाब्बासकीची थाप लाख मोलाची – प्रसाद ओक