Pune Crime | मित्र पत्नीसोबत ‘मज्जा’ मारायचे अन् पतीला मिळायचं ‘सुख’ आणि मिळायचा ‘आनंद’, पुण्याच्या बारामतीमधील धक्कादायक घटना; जाणून घ्या भयावह स्टोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती येथे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती येथील एका तरुणाने आपल्या काही मित्रांना (Friend) स्वत:च्या पत्नीवर बलात्कार (Rape in Pune) करायला लावला. हा धक्कादायक प्रकार मागील तीन वर्षापासून सुरु होता. आरोपी पती मित्रांना आपल्या पत्नीवर बलात्कार करायला लावत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने अखेर बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) फिर्याद दिल्यानंतर या घटनेला वाचा (Pune Crime) फुटली आहे. पोलिसांनी आरोपीसह पाच जणांना ताब्यात (Arrest) घेतले असून काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

 

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती तालुक्यातील एका गावातील तरुणीचे 2016 मध्ये एका तरुणासोबत लग्न झाले. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये लैंगिक समस्या (Sexual problems) निर्माण झाल्या होत्या. पती समलैंगिक (Gay) असल्याने तो आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हता. सुरुवातीचे काही दिवस पत्नीने याकडे दुर्लक्ष केले. मात्र कालांतराने ही समस्या वाढत गेली.

 

यातून आरोपीने एकेदिवशी आपल्या पत्नीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरुन आपल्या मित्रांना मेसेज केला आणि त्यांना भेटण्यासाठी घरी बोलावलं. मित्र घरी आल्यानंतर विकृत पतीने मित्राला पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितले. मित्र पत्नीवर बलात्कार करत असताना, मानसिकदृष्ट्या विकृत असलेला पती खूश होत होता. 2017 ते 2021 या कालावधीत विकृत पतीने अशाच प्रकारे आपल्या वेगवेगळ्या मित्रांकडून पत्नीवर बलात्कार करायला लावला. पत्नीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पती दररोज वेगवेगळ्या मित्राला घरी (Pune Crime) आणत होता.

 

पत्नीने या प्रकाराला विरोध केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. सहा महिने दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपी पतीने माफी मागितली.
परंतु पुन्हा तोच प्रकार सुरु ठेवल्याने पत्नी माहेरी गेली. तिने आपल्या घरच्यांना हा सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात जाऊन पीडितेवर 7 ते 8 जणांनी बलात्कार केल्याची तक्रार केली.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Gay husband forced friend to rape on own wife crime in baramati of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा