Pune Crime | दुर्देवी ! वीज कोसळल्यानं वडिलाच्या डोळ्यासमोर मुलीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कॉलेजमधून घरी आलेल्या मुलीच्या अंगावर वीज कोसळून (thunderstorm) तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली आहे. वडिलांच्या डोळ्यासमोर ही घटना घडल्याने वडिलांना मोठा धक्का बसला. ही घटना पुण्यातील (Pune Crime) आंबेगाव तालुक्यातील भोरदरा (Bhordara Ambegaon taluka) गावात गुरुवारी (दि.7) सायंकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मीरा सखाराम लोहकरे Meera Sakharam Lohkare (वय-19) असं या तरुणीचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिराचे वडिल सखाराम लिंबाजी लोहकरे (Sakharam Limbaji Lohkare) यांनी मंचर पोलीस ठाण्यात (Manchar police station) कळवली आहे.
पुणे जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) पडला.
आंबेगाव तालुक्यात देखील सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला होता.

मीरा कॉलेज वरून घरी येत होती. मीराचे वडील तिला दुचाकीवरुन घेऊन येत होते.
घराजवळ आले असता सखाराम यांनी मीराला खाली उतरुन चिखल बघून चालत ये असे सांगून ते पुढे जात होते.
त्याचवेळी मीराच्या अंगावर वीज कोसळली. मीराला तातडीने मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी तिला मृत (Pune Crime)घोषीत केले.

 

Web Title : Pune Crime | girl death lightning ambegaon pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | ‘जेनेसीस इंडिया’च्या पदाधिकारी प्रोमोही शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

Airtel ग्राहकांना मोफत मिळतोय 4 लाख रुपयांचा फायदा, तुम्हा सुद्धा ताबडतोब करा ‘हे’ काम? जाणून घ्या

DRDO Recruitment 2021 | डीआरडीओमध्ये विविध पदांवर भरती; जाणून घ्या सर्व काही