Pune Crime | बदनामीची धमकी देऊन तरूणीचा कॉलेजमध्ये केला विनयभंग, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका 15 आणि 17 वर्षाच्या मुलीचा वारंवार पाठलाग करुन 15 वर्षाच्या मुलीला बदनामी (Defamation) करण्याची धमकी (Threat) दिली. तसेच तिच्या 17 वर्षाच्या बहिणीचा कॉलेजमध्ये (College) जाऊन विनयभंग (Molestation Case) केल्याची खळबळजनक घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. हा प्रकार मागील दीड वर्षापासून सुरु होता. पोलिसांनी (Pune Police) आरोपी विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत पीडित मुलींच्या वडिलांनी (वय – 48 रा. धायरी – Dhayari) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजय लालगे Ajay Lalge (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरुद्ध IPC 354, 354 ड, 323, 506, पोक्सो (Pocso Act) 11/4, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 15 आणि 17 वर्षाच्या दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी डेक्कन परिसरातील एका कॉलेजमध्ये शिकते. आरोपी मागील दीड वर्षापासून दोन मुलींचा सारखा पाठलाग करत होता. आरोपीने 15 वर्षाच्या मुलीला पैशांची भुरळ घालून तिच्यासोबत बोलण्याचा व भेटण्याचा प्रयत्न करत होता. मुलीने भेटावे यासाठी त्याने तिला बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच तिला बोलण्यास भाग पाडून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने 17 वर्षाच्या मुलीच्या कॉलेजमध्ये जाऊन तु आमच्या मध्ये पडू नकोस अशी धमकी दिली. तसेच तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Beating) करुन विनयभंग केला असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Girl molestation in college by threatening defamation shocking incident in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा