Pune Crime | ऑनलाईन कर्ज घेणं तरुणीला पडलं महागात, अडकली बदनामीच्या घेऱ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऑनलाइन कर्ज (Online Loan) घेणं एका तरुणीला चांगलेच महागात पडलं आहे. या तरुणीने ऑनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेतलं. घेतलेलं कर्ज फेडून देखील तिच्याकडे पुन्हा पैसे भरण्यासाठी तगादा लावला. मात्र तिने दुर्लक्ष केल्यानंतर आरोपींनी तिचे फोटो मॉर्फ (Photo Morph) करुन ते फोटो तिच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील लोकांना पाठवून तिची बदनामी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे (Pune Crime) तक्रार केली.

 

याबाबत येरवडा येथे राहणाऱ्य 19 वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station)  फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विनयभंग (molestation), खंडणी (Extortion), धमकावणे (Intimidation), आयटी अ‍ॅक्ट (IT Act) नुसार मोबाईल धारकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही एका फायनान्स कंपनीत (Finance Company)  नोकरी (JOB) करते. तिच्या मोबाईलवर ऑनलाइन कर्जासंदर्भात एक लिंक आली होती. पहिली लिंक डाऊनलोड केल्यानंतर तिने त्या अ‍ॅपवर आपली सर्व वैयक्तिक माहिती भरली. त्याद्वारे तिला कर्ज मिळाले. यानंतर तिला दोन वेळा लिंक आल्या. त्याही तिने क्लिक करुन कर्ज मिळवले.

 

तरुणीने हँडी लोन अ‍ॅप (Handy Loan App) आणि फ्युचर वॉलेट या अ‍ॅपच्या (Future Wallet App)  माध्यमातून तेरा हजार रुपयांचे कर्ज घेतले. ते कर्ज तिने वेळेत फेडले. असे असताना तिला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन येण्यास सुरुवात झाली. त्याद्वारे तिला अतिरिक्त पैशाची मागणी केली जाऊ लागली. मात्र तिने सर्व पैसे दिल्यानंतर देखील वारंवार फोन येत असल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं.

तरुणी काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहून मोबाईल धारकाने तिच्या मोबईलच्या व्हॉट्सअ‍ॅपवर तिचा चेहरा असलेला नग्न अवस्थेतील फोटो मॉर्फ (Nude Photo Morph) करुन टाकला.
तिने याकडे देखील दुर्लक्ष केले. मात्र आरोपी एवढ्यावरच थांबला नाही
तर त्याने मोबाईल मधील कॉन्टॅक्ट लीस्ट हॅक करुन त्या मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअ‍ॅप तिचे मॉर्फ केलेले
नग्न अवस्थेतील फोटो पाठवून तिची बदनामी केली.

 

हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसानी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे (Police Inspector Crime Uttam Chakra)
आणि पोलीस अंमलदार अदिनाथ खेडकर (Adinath Khedkar) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | girl trapped in infamy after taking loan from online loan app pune cyber crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Ring Road | पुणे : रिंगरोड बाधितांना मिळणार तात्काळ मोबदला

 

 

7th Pay Commission | नवरात्रीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार भेट? DA Hike सह होऊ शकतात या 3 घोषणा!

 

Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाला बदल, जाणून घ्या नवीन दर