Pune Crime | प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराच्या मैत्रिणीला केली बेदम मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रियकर त्याच्या दुसऱ्या मैत्रिणील सतत फोन करुन तिच्यासोबत बोलत होता. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय प्रेयसीला आला. यावरुन तिने मित्रांच्या मदतीने प्रियकराच्या मैत्रिणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. तसेच हा वाद कशासाठी असे विचारणाऱ्या दुसऱ्या मैत्रिला देखील प्रेयसीने आणि तिच्या दोन मैत्रिणी आणि चार मित्रांनी अश्लील शिवीगाळ (Obscene Swearing) करत मारहाण (Beating) करुन शर्ट फाडून विनयभंग (Molestation) केला. ही घटना पुण्यातील हडपसरच्या (Hadapsar) ससाणेनगर परिसरात सोमवारी (दि.21) रात्री 8.15 ते 8.30 या दरम्यान घडला आहे.

 

याबाबत 22 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेयसी, तिच्या दोन महिला सहकारी मैत्रिण आणि चार अनोळखी मुलांवर विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा (Fir) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीची आणि प्रियकराची प्रेयसी साक्षी (नाव बदलले आहे) या दोघी मैत्रिणी आहेत. साक्षीचे मोहन (नाव बदलले आहे) याच्या सोबत मागील आठ वर्षापासून प्रेमसंबंध (Love Affair) आहेत. दरम्यान, प्रियकर मोहन हा तक्रारदार हिची मैत्रीण (संजना) हिच्याशी फोनवर सतत बोलत असतो. हा प्रकार साक्षीच्या लक्षात आला. संजना आणि मोहन यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय साक्षीला आला. त्यावरुन सोमवारी रात्री ससाणेनगर परिसरात साक्षीने संजनाला गाठले व तिला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी तक्रारदार तरुणी त्या ठिकाणी आली. तिने काय झालंय, इथ का तमाशा करतेस असे विचारल्याचा राग साक्षीला आला. साक्षीसोबत असणाऱ्या इतर दोन मैत्रिणी आणि चार अनोळखी मुलांपैकी एकाने तक्रारदार मुलीचा हात पकडून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करुन कानशिलात लगावली. तर दुसऱ्याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला.

 

त्यांच्यातील वाद एवढा वाढला की, तक्रारदार मुलगी तिची मैत्रिण संजना यांना साक्षी आणि तिच्या सोबत असलेल्या इतरांनी बेदम मारहाण केली.
यामध्ये दोघी जखमी झाल्या आहेत. हा सर्व प्रकार 15 मिनिटे सुरु होता.
यानंतर जखमी मुलीने साक्षी आणि तिच्या साथिदारांवर हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Girlfriend beats boyfriend’s girlfriend with the help of friends, shocking incident in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकासह 37 जणांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

 

Kiara Advani Viral Photo | हॉटेल मधून बाहेर येताना स्पॉट झाली कियारा अडवाणी, पाहा व्हायरल फोटो

 

Adinath Cooperative Sugar Factory | शेतकऱ्यांचा रोहित पवारांना धक्का? ‘तो’ कारखाना बारामती ॲग्रोला देण्याचा ठराव रद्द!