Advt.

Pune Crime | पुण्यात विषारी औषध पाजून शेळीला मारले; हडपसरमध्ये महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चपातीमध्ये विषारी औषध मिसळून ती शेळीला खायला देऊन तिचा मृत्यु (Death of a goat in pune) घडवून आणला असल्याची फिर्याद एका महिलेने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police Station) दिली आहे. (Pune Crime)

या फिर्यादीवरुन हडपसर (Hadapsar News) पोलिसांनी गोंधळेनगर (Gondhale Nagar) येथे राहणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुनाबाई पंडीत जोगदंड (वय ६६, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या घराजवळ शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली. जोगदंड यांनी एक शेळी पाळली होती. तिला आरोपी महिलेने चपातीमध्ये विषारी औषध मिसळून शेळीला खायला दिली. त्यामुळे शेळीचा मृत्यु (Pune Crime) झाला असल्याचा तिचा दावा आहे. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता या शेळीचे शवविच्छेदन करुन तिचा मृत्यु नेमका कशामुळे घडला, याचा तपास पोलीस करणार आहेत. पोलीस हवालदार लोखंडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Goat killed by poisonous drug in Pune; Filed a case against a woman in Hadapsar police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalna Crime | विवाहितेची 4 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या; जालना जिल्ह्यातील घटना

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Punit Balan Group | पहिली ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदसाठी लढत!

 

LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या