Pune Crime | पाषाण टेकडीवर फिरायला जाणे युगलांना पडले महागात, जोडप्याला मारहाण करुन PhonePe द्वारे 76 हजार रुपये लुटले
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | टेकडीवर फिरायला गेलेल्या जोडप्याला (Couple) तिघा चोरट्यांनी लुटल्याची (Robbery) घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) पाषाण येथील टेकडीवरील Pashan Tekdi (hill) सुसखिंडीत (Suskhind) शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली आहे. चोरट्यांनी जोडप्याला बेदम मारहाण (Beating) करुन त्यांच्या बँक खात्यातून (Bank Account) फोन पे (PhonePe) द्वारे जबरदस्तीने 76 हजार रुपये ट्रान्सफर (Transfer) करुन घेतले.
सुसखिंडीत फिरायला येणाऱ्या जोडप्यांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये मैत्रिणीसोबत फिरायला आलेल्या चिंचवडमधील (Chinchwad) 34 वर्षाच्या युवकाला तिघांनी मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी या जोडप्याकडून एक लाख रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला होता. तर एका तरुणाला पोलीस असल्याची बतावणी करुन मारहाण करत लुटले होते. हा प्रकार एप्रिल 2019 मध्ये घडला होता. यानंतरची ही तिसरी घटना आहे. (Pune Crime)
—
याप्रकरणी पिंपरीतील नेहरुनगर येथील एका 25 वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक व त्याची मैत्रिण पाषाण येथील डोंगरावर फिरायला आले होते.
तेथे दोघेजण एकांतात बसले होते. त्यांच्या जवळ अचानक तिघेजण आले. त्यांनी तुम्ही कुठले, इथे काय करता असे म्हणत मारहाण केली.
यानंतर या जोडप्याला जीवे ठार मारण्याची धमकी (Death Threats) देऊन फिर्यादी युवकाच्या बँक खात्यातून 40 हजार तर त्याच्या मैत्रिणीच्या बँक खात्यातून 36 हजार असे एकूण 76 हजार रुपये फोन पे द्वारे ट्रान्सफर करुन घेतले.
पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव (PSI Kapil Bhalerao) अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Going for a walk on a pashan hill cost the couple dearly beating the couple and robbing them of Rs 76,000 through PhonePe
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update