Pune Crime | खोदकामात सोन्या-चांदीची नाणी सापडल्याचे सांगून ज्येष्ठ व्यावसायिकाची 11 लाखांची फसवणूक; बुधवार पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खोदकामात सापडलेली सोन्या चांदीची नाणी (Gold And Silver Coins) स्वस्तात देतो, असे सांगणार्‍या चोरट्यांच्या नादी लागून एका ज्येष्ठ व्यावसायिकाने ११ लाख रुपये गमावल्याचा (Fraud Case) प्रकार समोर आला आहे (Pune Crime ).
याप्रकरणी बुधवार पेठेत (Budhwar Peth, Pune) राहणार्‍या ६३ वर्षाच्या एका व्यावसायिकाने फरासखाना पोलिसांकडे (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.

 

हा प्रकार १ मार्च ते २० मार्च दरम्यान रविवार पेठेतील त्यांच्या घरी व बुधवार पेठेतील दुकानात घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बुधवार पेठेत दुकान (Shops In Budhwar Peth) आहे.
ते दुकानात असताना दोन पुरुष व एक महिला तेथे आले. त्यांनी घराचे खोदकाम करताना चांदीचे व सोन्याची नाणी सापडल्याची बतावणी केली.
प्रथम त्यांना चांदीची व त्यानंतर सोन्याची खरी नाणी तपासणीसाठी दिली ती खरी असल्याचे आढळून आल्यावर फिर्यादी यांचा विश्वास बसला (Pune Crime).
त्यानंतर ते फिर्यादी यांच्या घरी आले.
त्यांनी एका कापडी पुरचुंडीत पिवळे धातूची १ किलो वजनाची नाणी देऊन त्याबदल्यात त्यांच्याकडून ११ लाख रुपये रोख घेतले.
त्यानंतर फिर्यादी यांनी ते गाळण्यासाठी दिले असताना ती नाणी सोन्याची नसून लोखंडी धातूची असल्याचे समजले.
त्यानंतर आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Gold and silver coins found in excavation cheating fraud case 11 lacs budhwar peth faraskhana police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा