Pune Crime | पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेला पकडले, 270 ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करणाऱ्या एका महिलेला पकडण्यात आले. तिच्याकडून तब्बल 270 ग्रॅम वजनाची सोन्याची भुकटी जप्त केली. ही कारवाई केंद्रीय सीमाशुल्क विभागाने Central Customs Department (कस्टम) केली. या महिलेने औषधांच्या कॅप्सूल मध्ये सोन्याची भुकटी लपवली होती. महिलेविरुद्ध कस्टम अ‍ॅक्ट (Customs Act) नुसार गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

कस्टमच्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सोन्याच्या तस्करी संदर्भात विभागाला गुप्तचर यंत्रणेमार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार, स्पाईस जेट (SpiceJet) कंपनीचे पुणे-बँकॉक विमान (Pune-Bangkok Flight) पुणे विमानतळावर आल्यावर संशयित महिलेची तपासणी केली. (Pune Crime) त्यावेळी तिच्याकडे 270 ग्रॅम वजनाची सोन्याची भुकटी आढळून आली. ही भुकटी औषधाच्या गोळ्यांच्या कॅप्सूल मधून आणली होती. ही महिला मुळची दिल्ली येथील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

पुणे- बँकाँक विमानसेवा नुकतीच सुरू करण्यात आली.
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांच्या हस्ते विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले होते.
त्यानंतर बँकॉकहून सोन्याची तस्करी करण्यात आल्याचा पहिला प्रकार उघडकीस आला.

 

Web Title :- Pune Crime | Gold smuggling woman caught at Pune airport, 270 grams of gold powder seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक