Pune Crime | सराईत गुंडाचा चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकूहल्ला; पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | प्रेमविवाहानंतर सातत्याने त्रास देत असल्याने माहेरी आलेल्या व मोबाईल ब्लॉक केल्याने चारित्र्याचा संशय घेऊन सराईत गुंडाने आपल्या पत्नीवर चाकूने पोटात वार (Attempt To Kill) करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बहिणीला वाचविण्यासाठी गेलेल्या मेव्हण्यावरही त्याने वार करुन जखमी (Pune Crime) केले आहे. धायरीमधील पंचरत्न क्लासिक सोसायटीत (Pancharatna clasic society, Raikar Mala Road, Jadhav Nagar, Mahadev Nagar, Dhayari, Pune, Maharashtra) रविवारी सकाळी हा प्रकार घडला.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) सचिन ज्ञानोबा आमले (वय ३०, रा. आमलेवाडी, घोटवडे, ता. मुळशी) याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.याप्रकरणात प्रतिक्षा सचिन आमले (वय २२, रा. धायरी) या जखमी झाल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा आणि सचिन आमले यांचा ५ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. लग्नानंतर दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. या कारणावरुन गेल्या दोन महिन्यांपूर्वी प्रतिक्षा माहेरी रहायला आली. मोबाईलवरुनही तो वाद घालत असल्याने तिने त्याला ब्लॉक केले होते. सचिन रविवारी सकाळी साडेदहा वाजता धायरी येथील तिच्या माहेरी आला होता.

मला तू मोबाईलवर ब्लॉक का केले असे विचारुन आता तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत त्याने धारदार चाकूने प्रतिक्षा हिच्या मानेवर, दोन्ही हातांवर (दंडावर), बोटांवर सपासप वार केले. आरडाओरडा ऐकून तिचा भाऊ तिला वाचविण्यासाठी मध्ये आला असता त्याने ओम तलाठी याच्या हातावर चाकूने वार (Pune Crime) करुन जखमी केले. दोघांनी आरडाओरडा सुरु केल्यावर तो पळून गेला. दोघांवर उपचार करण्यात आले असून सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तनपुरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | goon stabs wife over suspicion of character; Incident in Sinhagad Road area of ​​Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार