Pune Crime | जामीनावर सुटलेल्या गुंड सुरज रसाळवर टोळक्याकडून कोयत्याने वार; उंड्रीमध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्ववैमनस्यातून जामीनावर सुटलेल्या गुंडाला टोळक्याने कोयता, लाकडी बांबु, प्लास्टिक पाईपने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या उंड्री येथील घटनेत हा गुंड जखमी (Pune Crime) झाला आहे.

सुरज यादवराज रसाळ (वय १९, रा. कडनगर, उंड्री) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) ५ जणांना अटक केली आहे. चिराग शेवाळे (वय २४), सुनिल झरे (वय २४), ऋषभ शेवाळे (वय २३), ऋतिक ससाणे (वय २५), टोन्या मिथून (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. निखिल लोहार (वय २५), आकाश काळे (वय २५) आणि त्यांच्या इतर दोन ते तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उंड्री येथील क्लाऊड ९ सोसायटीसमोर १५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.

याप्रकरणी सोनु यादवराव रसाळ (वय २५, रा. कडनगर, उंड्री) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ सुरज रसाळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो कारागृहातून जामिनावर सुटून आला आहे. बुधवारी रात्री तो क्लाऊड ९ सोसायटीसमोरील रस्त्यावर उभा असताना पूर्वीच्या भांडणावरुन चिराग शेवाळे व त्याचे त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी सुरज याला कोयता, लाकडी, बांबु, प्लॉस्टिक पाईप याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याने हातावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत परिसरात दहशत निर्माण केली. कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | Goon Suraj Rasal, who was released on bail, was stabbed by a mob; Attempt to kill in Undri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari | नितिन गडकरींनी अनेक वर्षे पत्नीपासून लपवले हे मोठे गुपित, रस्त्यासाठी पाडले होते सासर्‍याचे घर

PM Modi Birthday | अजित पवार यांनी दिल्या PM मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा; महाराष्ट्राचा उल्लेख करत म्हणाले…

Gold Price Today | खुशखबर ! 5 महिन्यामधील सर्वात स्वस्त मिळतंय सोने, विक्रमी किमतीपासून 10 हजार रुपयांनी कमी झाला दर