Pune Crime | गुंडांच्या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना; कळस आणि कोंढव्यात वाहनांची केली तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या टोळीचे वर्चस्व दाखविण्यासाठी व परिसरात दहशत पसरविण्यासाठी गुंडांच्या टोळक्यांनी रस्त्यावर पार्क केलेल्या नागरिकांच्या वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) करण्याचे सत्र काही काळापूर्वी पुण्यात दिसून येत होते. हा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीतील कळस (Kalas)आणि कोंढव्यातील शिवनेरीनगर (Shivneri Nagar, Kondhwa) अशा दोन ठिकाणी एकाच दिवशी टोळक्यांनी वाहनांवर दगडफेक करुन कोयत्याने काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

याप्रकरणी सोमनाथ शंकर भगत (वय ४२, रा. कळस गाव) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम खैरे, ऋषीकेश खैरे व त्याच्या ७ ते ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ भगत यांनी घरासमोर आपली रिक्षा पार्क केली होती. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास खैरे व त्याचे साथीदार हातात कोयते घेऊन येथे आले. त्यांनी मोठमोठ्या शिवीगाळ करीत “कोणमध्ये येतो त्याला बघतोच माझेसमोर या खल्लास करतो, जिवंत सोडणार नाय” असे बोलून फिर्यादी यांच्या रिक्षाची काच फोडून नुकसान केले. तसेच परिसरातील लोकांच्या १० ते १२ दुचाकीवर लाकडी दांडके, कोयते मारुन नुकसान केले. (Pune Crime)

दुसरा प्रकार कोंढव्यातील (Kondhwa News) शिवनेरीनगर येथील डी पी रोडवर रविवारी रात्री दहा वाजता घडला.
याप्रकरणी मल्हारी हरीभाऊ पवार (वय ५२) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तीन दुचाकीवरुन सहा जणांचे टोळके हातात कोयते लाठ्या काठ्या घेऊन आले.
त्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेले फिर्यादी यांचे चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले.
तसेच इतर लोकांचे ५ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. कोयते व काठ्या हवेत फिरवून आमच्या नादाला लागला तर संपवून टाकू अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.
आपले वर्चस्व दाखविण्यासाठी सामान्यांच्या वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार शहरात पुन्हा सुरु झाला आहे.

Web Title : Pune Crime | Goons carrying lethal weapons damage vehicles in Kalas
Vishrantwadi and Shivneri Nagar Kondhwa area, terrorise citizens

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या