Pune Crime | पुण्याच्या गुलटेकडी परिसरात गुंडांचा हैदोस ! तरुणावर तलवार, कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Pune Crime | मोटारसायकल अंगावर घातली म्हणून जाब विचारल्याने गुंडाच्या टोळक्याने तरुणाच्या वाहनाची तोडफोड करुन तलवार, कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (swargate police) 6 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याबाबत राम राजू उमाप (वय 25, रा. अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर, सहकारनगर) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्रम शेख, अन्वर ऊर्फ जम्ब्या शेख, शाहरुख शेख, ओंकार पवार, अमित शेकापूर, इमात शेख (सर्व रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राम उमाप हे रविवारी आपल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी चालले असताना अन्वर शेखने उमाप यांच्या अंगावर मोटारसायकल घातली. फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोमवारी पहाटे ३ वाजता फिर्यादी यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालून त्यांच्या दुचाकीचा आरसा फोडून नुकसान केले. या प्रकारावर न थांबता टोळक्याने फिर्यादी हे सोमवारी दुपारी २ वाजता वडिलांचे घरी जात असताना गिरीधर भवन चौकात अक्रम शेख याने विनाकारण लाथ मारली. त्याचा फिर्यादीने जाब विचारल्यावर सर्व टोळक्याने येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. शाहरुख शेख याने त्याच्याकडील तलवारीने फिर्यादीचे मित्र गोविंद याच्या पोटात घुसवून त्यांना जबर जखमी केले. अमित शेकापूर याने फिर्यादी यांना बांबुने मारहाण केली. आजू बाजूच्या लोकांनी मदतीला येऊ नये, म्हणून या टोळक्याने तलवारी, कोयते, पालघन व बांबु घेऊन परिसरात दहशत माजविली. स्वारगेट पोलीस तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

PM Kisan | पीएम किसानच्या नवीन यादीतून कोणा-कोणाचे नाव वगळले?, ‘या’ पद्धतीने तपासा तुमच्या संपूर्ण गावाची यादी; जाणून घ्या

Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर वादग्रस्त विधानामुळे पुण्यासह नाशिक, महाड मध्ये गुन्हे दाखल, अटक होणार?; नाशिक, पुण्याहून पोलीस पथक चिपळूणला रवाना

Dahi Handi | राज्यात जन्माष्टमीला दहीहंडीची परवानगी नाही, कडक नियमांच्या आणि निर्बंधांच्या कक्षेत साजरा केला जाईल गणेशोत्सव; जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Goons’ haidos in Pune’s Gultekdi area! Attempt to kill a young man with a sword and a scythe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update