Pune Crime | सरपंच, उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत शिपायाने कार्यालयातच घेतला गळफास; परिसरात खळबळ

पुणे / ओतूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ग्रामपंचायतीच्या शिपायाने ग्रामपंचायत कार्यालयातच आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक (Pune Crime) घटना समोर आली आहे. सरपंच व उपसरपंच यांच्या मानसिक छळाला कंटाळून जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी येथील ग्रामपंचायत (Ahinvewadi Gram Panchayat) कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केलीय. प्रकाश शिवराम गोंदे (Prakash Shivram Gonde) (वय, 47 रा .अहिनवेवाडी ता. जुन्नर) असं आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी, शिपायाच्या (प्रकाश गोंदे) खिशात 2 चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. त्या चिठ्याच्या मजकुरावरुन प्रकाश गोंदेची पत्नी नंदा प्रकाश गोंदे (Nanda Prakash Gonde) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात (Otur Police Station) फिर्याद दिली आहे. शिपाई प्रकाश गोंदे (Prakash Shivram Gonde) यास पँरालिसिसचा त्रास होता. त्यामुळे त्यांना काम करण्यात अडचणी येत होत्या. सरपंच भिमाबाई नंदकुमार खंडागळे (Bhimabai Nandkumar Khandagale) आणि उपसरपंच स्वप्नील वसंत अहिनवे (Swapnil Vasant Ahinve) नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. प्रकाश गोंदे यांना दवाखाना आणि औषधोपचार यासाठी राहणीमान भत्त्याची गरज होती. तो त्यांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे मागितला. तो देण्यास दोघांनी नकार दिल्याने गोंदे यांनी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. (Pune Crime)

दरम्यान, यासंबंधी अहिनवेवाडीच्या सरपंच खंडागळे आणि उपसरपंच अहिनवे यांच्यावर ओतूर पोलीस ठाण्यात (Otur Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे (API Parashuram Kamble) यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे (DYSP Mandar Jawale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | gram panchayat peon commits suicide his office incident in pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

UGC Scholarship 2021 | विद्यार्थ्यांनी भरावा यूजीसी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज, मिळतील 7,800 Rs प्रति महिना; जाणून घ्या

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांवर मिळतो सर्वात जास्त रिटर्न; काही वर्षात पैसे होतात ‘दुप्पट’

Parambir Singh Suspended | IPS परमबीर सिंह निलंबीत ! मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांवर अशा प्रकारच्या कारवाईची पहिलीच वेळ

Multibagger Stock | 1 रुपया 45 पैशांचा हा शेयर झाला रु. 82 चा, केवळ 6 महिन्यात गुंतवणुकदारांना मिळाला 5550% रिटर्न; तुमच्याकडे आहे का?