Pune Crime | ‘आमची पोलिस खात्यात जबरदस्त ओळख’ ! 4 महिलांकडून कोटयावधीची सावकारकी; उच्चशिक्षीतेकडून 24 लाखाचे घेतले दीड कोटी; 5 जण अटकेत

पुणे (Pune Crime) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उच्च शिक्षित महिलेला 24 लाख ऊसने दिल्यानंतर चार महिला व त्यांच्या एका साथीदारांने गेल्या 7 वर्षात 24 लाखासोबतच व्याजासह तब्बल दीड कोटी रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस खात्यात आमची जबर ओळख असल्याची धमकी देत पैसे उकळलेे आहेत. तर आणखी सव्वा कोटी रुपये बाकी असल्याची धमकी महिलेचे व त्यांच्या आईचे अपहरण करत घरात डांबून ठेवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.

शगुप्ता सय्यद (वय 46), फरीदा युसूफ खान (वय 42, रा. वानवडी), आबिद शब्बीर साहा उर्फ डी. जे (वय 34, रा. खडकी), असमा नईम सय्यद (वय 35, रा. भवानी पेठ) आणि शहनाझ आसिफ शेख (वय 49, रा हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत 45 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (vimantal police station) तक्रार दिली आहे. त्यानुसार खंडणी, अपहरण (extortion and kidnapping) , सावकारी यासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील आजारी होते. त्यांना उपचारासाठी पैशांचीआवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी वडिलांच्या उपचारासाठी आरोपींची मदत घेत त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांनी 2014 मध्ये पैसे घेतले होते. व्याजाने हे पैसे घेतले गेले होते. तर त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या बहिणीकडून आरोपी शगुप्ता हिने 29 लाख 23 हजार घेतले. तर फरीदा खान हिने 78 लाख 32 हजार तसेच असमा सय्यद हिने 29 लाख 4 हजार आणि शहनाझ हिने 6 लाख 62 हजार रुपये असे एकूण 1 कोटी 43 लाख 23 हजार 635 रुपये घेतले.

Pune Crime | ‘Great identity in our police department’! One and a half crore taken from higher education for Rs 24 lakh, 5 arrested including four women

त्यानंतर देखील फिर्यादी व त्यांच्या आईला शिवीगाळ व दमदाटी करत रिक्षात बसवून फरीदा खानने तिच्या घरात डांबून ठेवले. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर पुन्हा रिक्षातून दोघींना त्यांच्याच घरी आणले. तसेच त्यांच्याकडून ब्लॅक चेकवर सह्या घेतल्या. तर कोऱ्या स्टॅम्प पेपरवर फिर्यादी व त्यांच्या आई यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. तर या महिलांनी आमची पोलीस खात्यात चांगली ओळख असून, आमचे नातेवाईक देखील पोलीस आहेत. आम्ही तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. दरम्यान फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या पाच जणांना अटक केली आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस (Vimantal Police) करत आहेत.

फिर्यादी या उच्च शिक्षित आहेत. त्यांच्या आईचा केटरिंगचा व्यवसाय आहे. येथे कामाला येणाऱ्या
कामगार महिलांकडून फिर्यादी यांची फरीदाशी ओळख झाली होती. त्यानंतर फिर्यादी यांनी फरीदा
हिच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी फक्त 24 लाख रुपये दिले होते. पण, त्यानी गेल्या 7 वर्षात
फिर्यादी व त्यांच्या बहिणीकडून तबल 1 कोटी 43 लाख रुपये, ब्लँक चेक, कोऱ्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्या
घेतल्या आहेत. तर आणखी सव्वा कोटी रुपये द्यावे लागतील असे म्हणत फिर्यादी यांच्या कुटुंबाला
धमकावत पैसे मागत होते, असे पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगेश
जगताप (Police Inspector Mangesh Jagtap) हे करत आहेत या पाच जणांना अटक
केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या पाच जणांना 5 दिवसांची
पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा

PM Kisan | पीएम किसान योजनेत महाराष्ट्रातील 4.45 लाख लाभार्थी अपात्र

Raj Kundra Arrested | CM ठाकरेंचं ‘ऑपरेशन क्लीन’ आहे तरी काय? राज कुंद्राला अटक म्हणजे बॉलिवूडला पहिला दणका?

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | ‘Great identity in our police department’! One and a half crore taken from higher education for Rs 24 lakh, 5 arrested including four women

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update