पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे -नगर रोडवर (Pune – Nagar Road) गुटखा (Gutka) वाहतूक करणार्या टेम्पोला अडवून पोलिसांनी ८ लाख ७७ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी पोलीस अंमलदार सोमनाथ भोरडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५०८/२२) दिली आहे. सवाराम लाबुराम देवासी (वय ३९, रा. कात्रज कोंढवा रोड (Katraj Kondhwa Road), मुळ रा. पाली, राजस्थान) या टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे. प्रकाश प्रेम भाटी, निजाम शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी हा कोंढवा भागातून गुटखा देऊन नगर रोडवरुन वाघोलीकडे निघाला होता. याची माहिती येरवडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर (API Ravindra Alekar) यांना मिळाली. त्यांनी येरवड्यातील सिद्धार्थनगर येथे हा टेम्पो अडविला. टेम्पोची पाहणी करण्यात आली. तेव्हा गोण्यांमध्ये गुटख्याचे पुडे आढळून आले. पोलिसांनी ८ लाख ७७ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar),
सहायक आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior Police Station Balkrushna Kadam),
गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे (Police Inspector Uttam Chakre)
यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र आळेकर, एकनाथ जोशी,
सोमनाथ भोरडे, आनंदा भोसले आदींनी ही कारवाई केली.
Web Title :- Pune Crime | Gutka worth nine lakhs seized from Tempo transporting Gutkha on Nagar Road
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Boney Kapoor | ‘या’ कारणामुळे बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरतात, बोनी कपूर यांनी सांगितले कारण
- Pushkar Shrotri – Santosh Juvekar | रेगे, मोरया सारख्या दमदार सिनेमांनंतर संतोष- पुष्कर पुन्हा दिसणार एकत्र
- Pune Crime | दारु पिताना झालेल्या वादातुन चुलत भावाचा खून, लोणी काळभोरच्या हद्दीतील घटना