Pune Crime | पुण्याच्या विमाननगर परिसरातून 14 लाखाचा गुटखा जप्त, दोघांवर कारवाई

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | शासनाने बंदी घातलेल्या गुटखा (Gutkha) आणि तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यातील (viman nagar police station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोघांना अटक (Arrest) केली असून दोन जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 14 लाख 25 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विमानतळ पोलिसांनी ही कारवाई खराडी बायपास चौक (Kharadi Bypass Chowk) ते मुळा रोड खडकी या दरम्यान मंगळवारी (दि.17) दुपारी दोनच्या सुमारास केली.

धनंजय राजेंद्र गावडे (वय-28 रा. नरविर तानाजी वाडी, शिवाजीनगर, पुणे),
सुरेश बच्चा मुखिया (वय-33 रा. मारुंजी हिंजवडी) यांना अटक करण्यात आली आहे.
तर चेतन पुरोहित (रा. हिंजवडी), अनुज (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक
सुशिल चंद्रकांत जाधव Sushil Chandrakant Jadhav (वय-38) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हद्दीत गस्त घालत असताना महेंद्र बोलेरो पिकअप
(Mahindra Bolero Pickup) संशयित रित्या येताना दिसला.
पोलिसांनी गाडी थांबवून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ आढळून आला. पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करुन दोन जणांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी (Pune Police) पिकअप वाहनासह 14 लाख 25 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Gutka worth Rs 14 lakh seized from Vimannagar area of ​​Pune, action taken against both

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Government | पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना 5 ते 6 % व्याजदराने कर्ज पुरवठा; जाणून घ्या कोणाचा होणार फायदा

Supreme Court | न्या. नागरत्ना पहिल्या महिला सरन्यायाधीश होणार?

Lack of Sleep | झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांना होतात ‘या’ लैंगिक समस्या, वैवाहिक जीवन होऊ शकते खराब

Weak Sperm | प्रेग्नंसी रोखणारी गर्भनिरोधक अँटीबॉडी, 15 सेकंदात स्पर्मला करेल कमजोर – स्टडी