Pune Crime | कर्नाटकातून पुण्यात विक्रीसाठी आणलेला 46 लाखांचा गुटखा हडपसर पोलिसांकडून जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातून पुण्यात (Pune Crime) विक्रीसाठी आणलेला गुटखा हडपसर पोलिसांनी जप्त (Gutkha Seized) केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.9) हडपसर येथे पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) मध्यरात्री केली. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) 46 लाखांच्या गुटख्यासह 71 लाखांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे. जप्त केलेला गुटखा बाजार भावाप्रमाणे 90 लाखांचा असू शकतो असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

सामीउल्लाह मुर्तजा हुसैन (वय-51 रा. फाईल टिंबर कॉर्पोनेशन, एसएस मार्ग, मुंबई, मुळ रा. मुर्तजा ग्राम मुडीलाकला पोस्ट लोहरसन संत कबीर नगर, उत्तरप्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे अनिल सदाशिवराव गवते (Anil Sadashivrao Gawte)
यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde) यांना निपाणी (Nipani) व विजापूर (Bijapur) येथून सोलापूर रोडने फुरसुंगी (Fursungi) येथील गोडाऊनमध्ये आयशर ट्रक (एमएच 14 जीयू 8462) मधून गुटखा नेला जाणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी सोलापूर रोडवरील 15 नंबर चौकात सापळा रचून आयशर ट्रक थांबविला.
ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी ट्रकची तपासणी केली त्यावळी पान मसाला गुटखा असल्याचे दिसून आले.
ट्रक चालकाकडे केलेल्या चौकशीत हा गुटखा निपाणी कर्नाटक (Karnataka) येथून आणल्याचे त्याने सांगितले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Inspector of Police Arvind Gokule),
पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर शिंदे (Police Inspector Digambar Shinde),
विश्वास डगळे (Police Inspector Vishwas Dagle)
यांचे सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड (API Ratnadeep Gaikwad),
पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस शिपाई शाहिद शेख, टोणपे, गव्हाणे, मद्देल, शरद धांडे, खरात यांनी केली.

 

Web Title :-  Pune Crime | Gutka worth Rs 46 lakh brought for sale from Karnataka to Pune seized by Hadapsar police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau Pune | पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या कोल्हापूरमध्ये 11 लाखाच्या लाच प्रकरणी प्रांताधिकारी ‘प्रधान’ आणि सरपंच ‘डवर’ला ACB कडून अटक

 

Pune Cyber Crime | बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे 11.5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

 

Railway Police | CSMT, कुर्ला रेल्वे स्थानकासह चार ठिकाणी आत्मघाती हल्ला करण्याचा फोन; जबलपूरच्या तरुणाला केली अटक

 

Modi Government | मोदी सरकारकडून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा ! साखर कारखान्यांचा 8 हजार 400 कोटींचा प्राप्तिकर माफ