Pune Crime | कंटेनरमध्ये 22 लाखांचा गुटखा, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे \ इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कंटेनर आणि उसाच्या ट्रॅक्टरचा अपघात (Accident) झाल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना अपघातग्रस्त कंटेनरमध्ये विक्री आणि वाहतुकीस बंदी असलेला तब्बल 22 लाखा 27 हजार 500 रुपयांचा गुटखा (Gutkha) आढळून आला. पोलिसांनी गुटखा आणि कंटेनर असा एकूण 47 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे. हा अपघात सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune highway) देशपांडे व्हेज हॉटेल (Deshpande Veg Hotel) समोर रविवारी (दि.9) पहाटे झाला होता.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे देशपांडे व्हेज हॉटेल समोर कंटेनरचा उसाच्या ट्रॅक्ट्रला पाठीमागून धडक बसून अपघात झाला होता. याची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्यातील (Indapur Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी वाहन चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामध्ये कंटेनरचा पुढचा भाग चक्काचूर झाल्याने क्रेनच्या मदतीने तो पोलीस ठाण्यात आणण्यात आला. (Pune Crime)

 

त्यानंतर आजपर्यंत अपघातग्रस्त कंटेनर बाबत कोणीच चौकशीसाठी किंवा त्यामधील मालासंदर्भात चौकशी करण्यासाठी आले नाही. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी (दि.13) त्या कंटेनरमध्ये कोणता माल आहे, काही संशयास्पद नाही ना हे पाहिले असता विक्रीस व वाहतुकीस बंदी असलेला सुमारे 22 लाख रुपये किमतीची 45 पोती प्रतिबंधित केलेला आर.के प्रिमीयम कंपनीचा (RK Premium Company) गुटखा मिळून आला. पोलिसांनी 22 लाख 27 हजार 500 रुपयांचा गुटखा आणि 25 लाख रुपये किंमतीचा कंटेनर असा एकूण 47 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कंटेनर चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (Pune Rural SP) डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), बारामती विभागाचे अप्पर अधीक्षक मिलींद मोहिते (Addl SP Milind Mohite) यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Gutkha worth Rs 22 lakh, goods worth Rs 47 lakh seized in containers; Action of Indapur Police of Pune Rural Police

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra IPS Officer Transfer | भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

 

Pune Corporation | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासाला महापालिकेचे प्राधान्य – महापौर मुरलीधर मोहोळ

 

Maharashtra Police Transfer | राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक (SP) / उपायुक्तांच्या (DCP) बदल्या

 

PM Narendra Modi | लॉकडाऊनची शक्यता नाकारली ! ‘पॅनिक होऊ नका, पण काळजी घ्या’ – PM मोदींचं आवाहन