Pune Crime | साडीला इस्त्री करण्याचे जास्त पैसे घेतल्यावरुन हडपसरमध्ये राडा, दगडफेक करुन केली मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | साडीला इस्त्री करण्यासाठी जादा पैसे घेतल्याच्या रागातून चार जणांनी लॉन्ड्री (Laundry) चालकाला बेदम मारहाण (Beating) केली. तसेच दुकानावर दगडफेक (Stone Throwing) करुन दुकानाचे नुकसान केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) हडपसर परिसरात घडली. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) अमित किसन पाचारणे (Amit Kisan Pacharane), अनिकेत किसन पाचारणे (Aniket Kisan Pacharane), सनी प्रकाश पानसरे (Sunny Prakash Pansare), अमोल अशोक शेळमकर Amol Ashok Shelamkar (सर्व रा. सातव नगर (Satav Nagar), हांडेवाडी रोड (Handewadi Road), हडपसर – Hadapsar) यांच्यावर IPC 326,452,323,504,506,427,34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी पवन कन्हैय्यालाल चौधरी Pawan Kanhaiyalal Chaudhary (वय-46 रा. हांडेवाडी रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.23) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आधार हॉस्पिटल (Aadhar Hospital) समोर लॉन्ड्री बॉईज सर्विस (Laundry Boys Service) नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री अमित पाचारणे हा फिर्यादी याच्या दुकानात जबरदस्तीने घुसला. साडीला इस्त्री करण्यासाठी जादा पैसे घेतल्याच्या कारणावरुन त्याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Pune Crime)

तसेच इतर आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानावर दगडफेक करुन दुकानाचे नुकसान केले.
आरोपी अमित याने लोखंडी सळईने फिर्यादी यांच्या कानाच्या वरच्या बाजूस आणि पाठिवर मारहाण केली.
यामध्ये फिर्य़ादी यांच्या उजव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Hadapsar Area Crime News Wanwadi Police Station FIR Against Four

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा