Pune Crime | सराईत गुन्हेगार सनी हिवाळेच्या खूनाचा बदला घेण्यासाठी हडपसरमध्ये 17 वर्षीय तरूणीचा राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | काळे पडळ येथील (Kalepadal Hadapsar) सराईत गुन्हेगार सनी हिवाळे (Sunny Hiwale) याच्या खूनाचा बदला (Revenge Of The Murder) घेण्यासाठी एका १७ वर्षाच्या तरुणीने सराईत गुन्हेगार व अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने एका स्टॉलधारकावर जीवघेणा हल्ला (Attempt To Kill) केल्याची घटना रविवारी रात्री घडली. (Pune Crime)

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) दोघा सराईत गुन्हेगारासह ७ जणांवर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. (Pune Crime)

विठ्ठल धनंजय चौगुले (वय १९, रा. काळेपडळ, हडपसर), ऋषीकेश ऊर्फ जंगल्या भारत पांचाळ (वय २०, रा. ऊरुळी देवाची) आणि चैतन्य तुळशीराम कराड (वय २३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विठ्ठल चोगुले व ऋषीकेश पांचाळ हे सराईत गुन्हेगार आहेत.
याप्रकरणी चेतन प्रविण जगताप (वय १९, रा. भेकराईनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५८३/२२) दिली आहे. ही घटना काळे पडळ येथील तुकाई दर्शनमधील ढवळे फ्रुट स्टॉलसमोर रविवारी रात्री ९ वाजता घडली.

सनी ऊर्फ गिरीश महेंद्र हिवाळे (वय २४, रा. काळे पडळ, हडपसर) हा स्वत: ला काळे पडळचा भाई समजत होता.
त्याच्यावर मोक्का कारवाई (MCOCA Action) करण्यात आली होती.
त्याची ९ एप्रिल रोजी येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) जामिनावर सुटका झाली होती.
त्यानंतर एका मित्राच्या वाढदिवसासाठी १२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता तो व त्याचे मित्र चौकात जमले असताना १५ ते २० जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके व दगडाने ठेचून सनी हिवाळे याचा खून केला होता. त्या घटनेत त्याचा मित्र सोहेल इनामदार हा जखमी झाला होता. (Pune Criminals)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्याचे साई डेअरी या स्टॉल शेजारी असलेल्या ढवळे फ्रुट स्टॉलजवळ रविवारी रात्री थांबले होते. यावेळी एक १७ वर्षाची अल्पवयीन तरुणी तिच्या साथीदारांसह तेथे आली. तिने सनी हिवाळे याच्या खूनाच्या कटात असल्याचा संशय घेऊन फिर्यादी याच्या अंगावर लोखंडी कोयता घेऊन धावून आली. तेव्हा फिर्यादी याने फ्रुट स्टॉलचे शटर आतून ओढून घेतले.
त्यावेळी तिने कोयत्याने शटरवर घाव घातले. तु सनीच्या मर्डरच्या कटात शामील होता. मी तुला जिवंत सोडणार नाही.आता मला कशाची भिती नाही.
जर कोण मध्ये आला तर मी कोणाला सोडणार नाही, अशी धमकी देऊन शटरवर वार करुन शटर उघडण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीचे आई वडिल तेथे आले असताना त्यांनाही मी तुम्हा सगळ्यांना मारुन टाकणार आहे, अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.
हडपसर पोलिसांनी (Pune Police) खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Hadapsar Kalepadal Sunny Hiwale Revenge of murder 17 years old girl attack on stall owner

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त