Pune Crime | शेतीला पाणी देण्यावरुन झालेल्या भांडणात भावांमध्ये तुंबळ हाणामारी अन् खुनाचा प्रयत्न, हडपसर पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वडिलोपार्जित जुन्या विहिरीतील पाणी शेतीसाठी देण्याच्या करणावरुन भावा भावांमध्ये झालेल्या भांडणात विळा, कुदळीने वार करुन खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याची घटना फुरसुंगी (Fursungi) येथे घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) दोघांना अटक केली असून ७ जणांवर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

विलास एकनाथ चोरघडे (वय ५८) आणि प्रवीण विलास चोरघडे (वय ३२, रा. चोरघडे मळा, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अनिल एकनाथ चोरघडे, तुषार विलास चोरघडे, ओंकार अनिल चोरघडे (वय २३), शुभम अनिल चोरघडे (वय २२), राहुल रंगनाथ चोरघडे (वय २०) अशी गुन्हा दाखल (Pune Crime) झालेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी विजय मफाजी चोरघडे (वय ५१, रा. चोरघडे मळा, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी यांचे वडिलोपार्जित जुन्या विहीरीतील शेतीसाठी पाणी देण्यावरुन त्यांच्यात गुरुवारी सकाळी भांडणे झाली. तेथे आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण (Attempt To Murder) केली. फिर्यादी यांचा पुतण्या रतन चोरघडे याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तुषार चोरघडे याने हातातील विळ्याने रतनच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. यावेळी फिर्यादीचा भाऊ शिवाजी हा भांडणे सोडविण्यासाठी आला असताना त्यांना अनिल चोरघडे याने हातातील कुदळीने गळ्यावर व पाठीमागील बाजूस मानेवर वार करुन जखमी केले. ओंकार चोरघडे याने त्याच्या हातातील पाईपाने व अनिल याने रॉडने शिवाजी चोरघडे यांना मारहाण करुन जखमी केले आहे. हडपसर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (IPC 307) दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी परस्परविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
पल्लवी तुषार चोरघडे (वय २९) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार रतन चोरघडे, वैभव चोरघडे, विजय चोरघडे, शिवाजी चोरघडे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी या त्यांचे दिर काम करीत असलेल्या शेतात चहा देण्यासाठी जात होत्या.
त्यावेळी त्यांचे दिर ओंकार चोरघडे यांना आरोपी मारहाण करीत असल्याचे दिसले.
त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी फिर्यादी या मध्ये पडल्या असताना विजया चोरघडे यांनी त्यांना बाजूला ढकलले.
रतन चोरघडे याने त्यांना लाथ मारल्याने त्यांचा तोल जाऊन त्या बांधावरुन खाली पडल्या.
तेथील दगडावर हात आपटल्याने त्यांचा हात फॅक्चर झाला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Hadapsar police arrest two in fight over water supply

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा