Pune Crime | हडपसरचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदमांची उचलबांगडी ! अवैध धंद्यांमुळं कारवाई? ‘त्या’ कर्मचार्‍यांमुळे वरिष्ठ ‘गोत्यात’

पुणे : (नितीन पाटील) :- Pune Crime | पोलिस आयुक्तालयातील हडपसर पोलिस ठाण्यातील (Hadapsar Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सिताराम कदम (Sr.PI Balkrishna Sitaram Kadam) यांची तडकाफडकी उचलबांगडी (Transfer) करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती थेट शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (Control Room) करण्यात आली आहे. हडपसर सारख्या A+ Grade पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने शहर पोलिस दलात अवैध धंद्याबाबत (illegal business) उलट-सुलट चर्चा रंगली आहे. हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आल्यामुळेच अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी ही कारवाई केली असल्याची चर्चा सध्या पोलिस वर्तुळात आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर कारवाई झाली पण त्यांच्या नावावर महिन्याकाठी ‘माया’ (Money) गोळा करणारे हडपसर पोलिस ठाण्यातच बस्तान बांधून बसले (Pune Crime) आहेत.

Gold Price Today | सणासुदीच्या काळात वाढला सोन्याचा दर, तरीसुद्धा मिळतेय 9894 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सिताराम कदम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे तर गुन्हे शाखेत (Pune Police Crime Branch) कार्यरत असलेले अरविंद तुळशिराम गोकुळे (Sr. PI. Arvind Gokule) यांची हडपसरच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, गोकुळे यांची शहरातील एखाद्या A+ Grade पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी वर्णी लागणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासुन शहर पोलिस दलात होती. त्यांना लवकरच A+ Grade पोलिस ठाणे बहाल करण्यात येणार हे सर्वश्रुत (Pune Crime) होते.

हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असल्याची माहिती अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना मिळाली होती.
त्यानुसार सोमवारी हडपसर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत सखोल माहिती घेण्यात आली.
त्यानंतर अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांना देखील याबाबत सांगितले.
त्यानंतर सोमवारी मध्यरात्री हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांची हडपसरवरून बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी गोकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सावधान ! WhatsApp यूजर्स Hackers च्या जाळ्यात, आता असे लूटत आहेत पैसा, जाणून घ्या बचावाची पद्धत

यापुर्वी देखील शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या.
तरी देखील काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असल्याचे सध्या चित्र आहे.
त्यामुळेच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी पुन्हा एकदा संबंधित सर्व अधिकार्‍यांना तंबी दिली आहे.
आगामी काळात पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा ज्या पोलिस ठाण्याकडील अधिकारी तसेच अंमलदारावर अ‍ॅन्टी करप्शनकडून (ACB) गुन्हा दाखल झाल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई (Pune Crime) करण्यात येईल असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
मात्र, अशा प्रकारचा आदेश यापुर्वी देखील काढण्यात आला होता.

विमाननगर पोलिस ठाण्यातील (Viman Nagar Police Station) एका पोलिस अधिकार्‍याला लाचेची (Bribe) मोठी रक्कम घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले.
त्यानंतर संबंधित अधिकार्‍यावर निलंबनाची (Suspended) कारवाई देखील झाली.
मात्र, इतर कोणावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
अवैध धंद्यांबाबत तंबी देणे हा अलिकडील काळात रूटीन आदेश झाल्याचे पहावयास मिळत आहे.

Risod police | 3.45 कोटी रुपयांचा 11 क्विंटल गांजा जप्त, 4 जणांना अटक

अवैध धंद्यांना ‘वसुली’वाल्यांचा आशिर्वाद ?

शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात आणि शहर पोलिस दलातील जवळपास प्रत्येक आस्थापनेमध्ये संबंधित वरिष्ठांचे कामकाज पाहण्याची जबाबदारी एखाद्या पोलिस कर्मचार्‍यावर असते.
त्याला वसुलीदार म्हणून संबोधिले जाते.
शहरात प्रत्येक ठिकाणी ‘वसुली’वाल्यांची चालती असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे.
काही महिन्यांपुर्वी शहर पोलिस दलातील कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या.
त्यामध्ये अति वरिष्ठ अधिकार्‍यांनी काही वसुलीवाल्यांना चांगलेच काम दाखवले.
मात्र, अति वरिष्ठांचे आदेश फाटयावर मारत काही जणांनी बदली झालेल्या हेवीवेट पोलिस कर्मचार्‍यांना बदलीच्या ठिकाणावरून अद्याप सोडलेले नाही.
काही जण तर अद्यापही छातीठोकपणे वसुली करत असल्याची चर्चा आहे.

सर्व पोलिस कर्मचार्‍यांच्या पादर्शक बदल्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
ते वास्तव देखील सर्वांनी पाहिलं.
मग बदली झालेल्या अनेक पोलिस कर्मचार्‍यांना अद्याप कोणी रोखुन धरलंय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अति वरिष्ठांच्या आदेशाला फाटा मारत अनेक पोलिस कर्मचारी बदली झाल्यानंतर देखील अनेक महिने मुळ पदावर राहून स्वतः मलिदा गोळा करून संबंधित वरिष्ठांचे चांगलेच समाधान करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

दरम्यान, अवैध धंद्यामुळे हडपसर सारख्या A+ ग्रेड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची उचलबांगडी झाल्यामुळे सध्या सेक्शन खुपच गरम झालंय.
त्यामुळे इतर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक देखील चांगलेच टेन्शनमध्ये आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीसह आणखी काही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांचा सातबारा अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी डोळया खालून घातला आहे.
त्यामुळे आगामी काळात अवैध धंद्यांना खतपाणी घालणार्‍या आणखी काही पोलिस अधिकार्‍यांवर निश्चितपणे कारवाई होणार हे यावरून स्पष्ट (Pune Crime) होत आहे.

Russia Suspends Its Mission To NATO | रशियानं बंद केलं नाटोचं मिशन, NATO चं मॉस्कोमधील इनफॉर्मेशन ऑफिस होणार बंद !

हडपसर पोलिस ठाण्याच्या शेजारी देखील ‘हिरवळ’

हडपसर पोलिस ठाण्याच्या चारही बाजूला असलेल्या सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘अवैध’ची बरीच ‘हिरवळ’ असल्याचं चित्र आहे.
सोलापूर रोडवर असलेल्या काही हॉटेलमध्ये तर रात्री उशिरापर्यंत बरचं काही सुरू असल्याची माहिती मिळतेय तर एका पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पुण्यातील सर्वात मोठा ‘अवैध’ अड्डा सुरू असल्याची ‘खुसफूस’ काही ठिकाणी होत आहे.
हडपसरच्या शेजारी असलेल्या ‘हिरवळी’कडे देखील संबंधित अधिकार्‍यांची ‘तीक्ष्ण’ नजरेनं पाहून संबंधितांवर कारवाई व्हावी अशीच अपेक्षा नागरिकांची असणार आहे.
दरम्यान, काही पोलिस अधिकारी अति वरिष्ठांच्या गळयातील ‘ताईत’ बनल्याने त्यांच्यावर वेळावेळी ‘मेहरबानी’ होत असल्याचं वाचनात येतंय.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Hadapsar Police Station Senior Inspector Balkrishna Kadam Transferred, Arvind Gokule Appointed As Senior Police Inspector In Hadapsar Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update