Pune Crime | पुण्यातील घटनेने अजब खळबळ ! ‘एका मुलाचा मृत्यू, अंत्यसंस्कार मात्र दोघांवर?; पोलिसही चक्रावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात एक अजब आणि खळबळजनक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. मुठा नदीच्या कालव्यात पोहायला गेलेला मुलगा हरवल्याची तक्रार एका कुंटूबांनं केली होती. त्यानंतर स्वारगेट पोलिसांच्या (Swargate Police) तपासानंतर एका मुलाचा मृतदेह आढळून आला. संबधित कुटुंबाला मृतदेहाची ओळख पटल्यानं पोलिसांकडून मृतदेह त्यांच्या स्वाधीनं करण्यात आला. हा आपलाच मुलगा असल्याचं सांगत या कुटुंबांनी मृतदेह घेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान या घटनेमध्ये आणखी एक ट्विस्ट आलेय.

यानंतर दुस-या दिवशी हडपसर पोलिसांनाही (Hadapsar Police) 16 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यांनीही याबाबत माहिती या कुटुंबाला दिली. त्यावेळी कुटुंबाने हा मुलगा आपलाच असल्याचं सांगितलं. ओळख पटताच पोलिसांनी मृतदेह कुटुंबाच्या स्वाधिनं केला. त्याच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी या कुटुंबाने आदल्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल हडपसर पोलिसांना काहीही सांगितलं नाही. (Pune Crime)

या घटनेनंतर दोन्ही मृतदेह एकाच मुलाचे कसे असणार? याबाबत माहिती मिळवण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी या कुटुंबाला फोन केला. हडपसरमध्ये सापडलेला मृतदेह आपल्या मुलाचा होता आणि स्वारगेट पोलीस कोणत्या मृतदेहाबद्दल बोलतायत हे आपल्याला माहित नसल्याचा अजब दावा त्यांनी केला. यानंतर आता स्वारगेट पोलिस पुन्हा एकदा त्या 16 वर्षीय मुलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्याचबरोबर आता मुठा कालव्यातच हरवलेल्या आणखी एका 16 वर्षांच्या मुलाचा तपास सिंहगड पोलीस (Sinhagad Police) देखील करत आहेत. धायरीतला (Dhayari) हा मुलगा आपल्या मित्राबरोबर कालव्याकडे फिरायला गेला होता, त्यानंतर तो हरवला. तर स्वारगेट पोलिसांना सापडलेला मृतदेह धायरीतल्या या मुलाचा असण्याची शक्यता सिंहगड पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी धायरीतील मुलाच्या कुटुंबाला आपल्याकडच्या मुलाच्या मृतदेहाचा फोटो दाखवल्यानंतर हा आपला मुलगा नसल्याचं ते म्हणाले. आता या प्रकरणातला सखोल तपास पोलिस करत आहेत.

Web Title : Pune Crime | Hadapsar Swargate Sinhagad Police Station Crime News Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त