Pune Crime | कोंढव्यात गुंडांकडून चारचाकी, मोटारसायकल, टेम्पोच्या काचा फोडून दहशत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने ५ ते ६ जणांच्या टोळक्याने पिसोळी (Pisoli) येथे येऊन वाहनांच्या काचा फोडून हैदोस घातला. याप्रकरणी दीपक ज्ञानोबा धावडे Deepak Gyanoba Dhwade (वय ४०, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७५३/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

त्यावरुन पोलिसांनी ५ ते ६ जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना पिसोळीतील जंगदबा भवन मार्गावरील सुदामा भेळसमोर शुक्रवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसोळी येथील जंगदबा भवन मार्गावर नागरिकांनी आपली वाहने पार्क केली होती.
५ ते ६ जणांच्या टोळक्यांनी तेथे येऊन लोखंडी कोयता, दगड, विटा यांच्या सहाय्याने फिर्यादी व इतरांच्या वाहनांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडल्या.
त्यात २ चारचाकी, १ टेम्पो, १ पिकअप गाडी यांचे मोठे नुकसान झाले. तसेच दुचाकी गाड्या फोडून नुकसान केले.
परिसरात आरडा ओरडा करत दहशत पसरवून ते निघून गेले. कोंढवा पोलीस (Kondhwa Police) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Haidos of gangsters in Kondhva; Panic was spread by breaking the glass of four-wheelers, motorcycles and tempos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा