Pune Crime | आई-वडिल जादुटोणा करत असल्याच्या संशयाने विवाहिताचा छळ; महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणात पतीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | आई वडिल जादुटोणा करतात, त्यामुळे मला यश येत नाही, असा संशय घेऊन विवाहितेला मारहाण करुन छळ केला जात होता. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या (Married Woman Suicide) केली. दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) पतीला अटक केली आहे. (Pune Crime)

अतुल गोरख साळवे (रा. जनता वसाहत, पर्वती) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. सुनिता साळवे आणि आकाश साळवे (रा. जनता वसाहत, पर्वती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कविता अतुल साळवे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. (Pune Crime)

याप्रकरणी प्रकाश त्रिंबक तायडे (वय ६०, रा. चांगेफळ, बुलढाणा) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी कविता हिचा विवाह अतुल गोरख साळवे यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून तिचा सासरी छळ होत होता. तुझ्यासोबत लग्न झाल्यामुळे माझे वाटोळे झाले. तुला घरातील काम करता येत नाही. तुझे वडील जादु टोणा करतात. त्यामुळे मला यश येत नाही, असे बोलून तो तिच्याशी वाद घालून मारहाण करीत असे़ या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून कविता हिने २ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर अंत्यसंस्कार व अन्य विधी केल्यानंतर तिच्या वडिलांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक खरात अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Harassment of a married woman on suspicion of practicing witchcraft; Husband arrested in woman’s suicide case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock List | ‘हे’ 5 मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणुकदारांना करत आहेत मालामाल,
31 दिवसात मिळाला 550% चा जबरदस्त रिटर्न, पोर्टफोलियोमध्ये करू शकता समावेश!

 

Shreyas Iyer | कोलकाताच्या कर्णधारपदाची धुरा मुंबईकर खेळाडूवर; KKR ची मोठी घोषणा

 

Ajit Pawar | ’10 मार्चला मंत्रिमंडळात फेरबदल?’ नाना पटोलेंच्या विधानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…