पुणे : Pune Crime | विसर्जन मिरवणुकीत (Ganapati Immersion Procession) मोबाईल चोरणार्या (Mobile Thief) हरियानातील (Haryana) चोरट्याला फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police) पकडले. त्याच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (Pune Crime)
सहदेवसिंग चहलसिंग चौहान Sahdev Singh Chahal Singh Chauhan (वय ३०, रा. सिकंदरपूर, जि. पलवाल, हरियाना) असे अटक (Arrest) केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत कोथरुडमध्ये राहणार्या एका अल्पवयीन मुलाने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हा विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी बेलबाग चौकात (Belbag Chowk, Pune) आला होता. त्यावेळी गर्दीत मुलाकडील १० हजार रुपयांचा मोबाईल चौहान याने हिसकाविला. मुलाने आरडाओरडा केला. बंदोबस्तावरील पोलिसांनी चौहान याला पकडले. (Pune Crime)
विसर्जन मिरवणुकीत शेकडो मोबाईल चोरीला गेले असले तरी केवळ पाच गुन्हे दाखल करुन घेण्यात आले आहे.
विसर्जन मिरवणुकीत मोबाइल हिसकावण्याचे फरासखाना, विश्रामबाग (Vishram Bagh Police Station),
वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) वेगवेगळे पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात एका तरुणीचा ४० हजारांचा मोबाइल लांबविण्यात आला.
नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर एकाचा १० हजारांचा मोबाइल लांबविण्यात आला.
शनिवारवाडा परिसरात पेशवे गणपती मंदिरासमोर तरुणाच्या खिशातून ५ हजारांचा मोबाइल लांबविण्यात आला.
बेलबाग चौकात एकाचा ५ हजार रुपयांचा मोबाइल चोरुन नेण्यात आला.
वानवडीतील संविधान चौकात विसर्जन मिरवणुकीत नृत्य करणार्या तरुणाच्या खिशातून ४० हजारांचा मोबाइल चोरुन नेण्यात आला.
Web Title :- Pune Crime | Haryana thief jailed for stealing mobile phone during immersion procession
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rain in Maharashtra | ’या’ जिल्ह्यांत पावसाची तीव्रता वाढणार, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन!