Pune Crime | ‘माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा बदनामी करेन’ ! तरुणीला धमकी देणारा तरुण गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | माझ्यासोबत मैत्री करुन शारिरीक संबंध (Sexual Relations) ठेव, अन्यथा फोटो सोशल मीडियावर (Social Media) टाकून बदनामी (Defamation) करेन अशी धमकी (Threat) एका तरुणीला देऊन तिचा विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याच्या (Chakan Police Station) म्हाळुंगे पोलीस चौकीत (Mahalunge Police Chowki) एका तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि.23) दुपारी चारच्या सुमारास म्हाळुंगे येथील भाजी मार्केटजवळ (Pune Crime) घडला.

 

नुर पिर मोहम्मद Nur Pir Mohammad (वय-23 रा. वराळे रोड, म्हाळुंगे, ता. खेड मुळ रा. लोटाढ ता. मेजारोड जि. इलाहाबाद (Allahabad), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्याच्या म्हाळुंगे पोलीस चौकीत बुधवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीच्या घरी जाऊन माझ्याशी मैत्री (Friendship) कर आणि शारीरिक संबंध ठेव,
नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली.
तसेच तरुणीचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
पीडित तरुणीने म्हाळुंगे पोलीस चौकीत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 354,354(अ) नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थेऊरकर (PSI Theurkar) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | have sexual relations with me or i will slander you threatened the young woman in pimpri youth arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात मोबाईलच्या कारणावरून मामाने भाचाच्या पोटात खुपसला चाकू

 

Budget 2022 | अर्थसंकल्प 2022 : कोरोनाने प्रभावित छोट्या दुकानदारांसाठी होऊ शकते भरघोस मदतीची तरतुद, सरकार देऊ शकते आर्थिक मदत

 

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 54 जणांवर कारवाई