Pune Crime | ‘तू मोठी झाली आहे का, मला बघायचे आहे’, नराधम पित्याकडून 11 वर्षाच्या मुलीशी लज्जास्पद कृत्य

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | ‘तू मोठी झाली आहे का, मला बघायचे आहे’, असे म्हणून जन्मदात्या पित्याने पोटच्या 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिरात उघडकीस आली आहे. पत्नीने याचा जाब विचारला असता, तिला आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी नराधमाने दिली. याप्रकरणी 45 वर्षीय नराधम पित्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाकड पोलिसांत तक्रार दिली असून हा प्रकार 14 ऑक्टोबर 2021 पूर्वी सहा महिन्यापासून घडला आहे.
वाकड पोलिसांनी नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पित्याने त्याच्या 11 वर्षाच्या मुलीवर लैगिक अत्याचार केले.
मुलीने विरोध केला असता त्याने मुलीला मारहाण केली. तू मोठी झाली आहे का, मला बघायचे आहे.
असे म्हणून नराधम बापाने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime) केले.

हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने पतीकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर आरोपीने पत्नी आणि पीडित मुलीला मारहाण केली.
तसेच तू जर कोणाला काहीही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना मारुन टाकेल, अशी धमकी दिली.
यानंतर महिलेने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीसोबत घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोडे (PSI Gode) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | ‘Have you grown up, I want to see’, shameful act by father to 11 year old girl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

स्पोर्ट बाईकची आवड असेल तर 16 हजारात घरी आणा Yamaha FZ 25, इतका द्यावा लागेल मासिक EMI

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 126 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यातील बड्या रुग्णालयात गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण, शहरात प्रचंड खळबळ