Pune Crime | आई-वडिलांच्या समाधानासाठी त्याने परदेशात नोकरीचा रचला बनाव; बनावट व्हिसा, तिकिटासह आयटी इंजिनिअरला पुण्याच्या लोहगाव विमानतळावर झाली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका आयटी इंजिनिअरने (IT Engineer) आईवडिलांच्या समाधानासाठी त्यांना विदेशात नोकरी लागल्याचे सांगितले. त्याने विदेशात जायचे नाटक करून मित्राकडे दुसऱ्या शहरात जाऊन राहण्याचे निश्चित केले होते. मात्र, आई-वडील पुण्याच्या लोहगाव विमानतळावर (Lohegaon Airport) सोडायला येणार होते. त्यामुळे त्याने बनावट व्हिसा (Fake Visa) आणि तिकीट (Fake Air Ticket) तयार करून घेतले. विमानतळावरुन आई-वडील परत गेल्यानंतर बाहेर येताना नेमका तपासणीमध्ये हा तरुण पकडला गेला आणि त्याला अटक (Pune Crime) झाली.

 

असीम रवींद्र गोगटे Asim Ravindra Gogte (वय 30, रा. कुमार क्लासिक, औंध) असे अटक इंजिनिअरचे नाव आहे. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (Central Industrial Security Force) जवान अरवींद्रकुमार सिंग यांनी फिर्याद दिली आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे (Viman Nagar Police Station) उपनिरीक्षक पाठक (PSI Pathak) यांनी दिलेल्या माहितीनुसार, असीम याचे शिक्षण अमेरिकेत (united states of america) झाले आहे. शिक्षण घेऊन आयटी इंजिनिअर झाल्यावर तेथेच त्याने चार वर्षे नोकरी केली. परंतु,  2019 साली त्याची नोकरी गेली. त्यामुळे त्याला पुन्हा भारतात यावे लागले.

दोन वर्षांपासून आई-वडिलांना त्याची काळजी लागून राहिली होती. ते सतत नोकरी संदर्भात त्याच्याकडे विचारणा करीत होते. विदेशात नोकरी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र, त्याला विदेशात जायचे नव्हते. त्यांना समाधान वाटावे यासाठी त्याने कॅनडामध्ये (canada) नोकरी मिळाल्याचे सांगितले. कॅनडाला (Jobs In Canada) जाण्यासाठी त्याने बनावट व्हिसा आणि तिकिटे तयार केली. पुणे ते दिल्ली (Pune to Delhi Flight) आणि दिल्ली ते व्हॅनकुवर, कॅनडा अशी दोन तिकिटे त्याने तयार केली. आईवडिलांनी विमानतळावर सोडले की पुन्हा गुपचूप बाहेर येऊन मित्राकडे दुसऱ्या शहरात जाऊन रहायचे असे त्याच्या डोक्यात होते.

 

ठरल्याप्रमाणे आई-वडील त्याला सोडायला विमानतळावर आले.
तो विमानतळावर गेल्यानंतर आईवडील त्याचा निरोप घेऊन घरी परत गेले.
त्यानंतर काही वेळाने असीम पुन्हा विमानतळाबाहेर येण्यास निघाला.
तेव्हा CISF च्या सुरक्षारक्षकांनी त्याला अडविले. त्याच्याकडे चौकशी करून तपासणी केली.
तेव्हा त्याच्याकडील व्हिसा आणि तिकिटे बनावट असल्याचे समोर आले.
त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यासंदर्भात फिर्याद दाखल करून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात (Pune Crime) देण्यात आले.
पोलिसांच्या तपासात असीमने आपला शासन किंवा इतर कोणालाही फसविण्याचा हेतू नव्हता असे स्पष्ट केले.
केवळ आईवडिलांना समाधान वाटावे याकरिता हा उपद्व्याप केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

 

Web Title :- Pune Crime | He arranged a job abroad for the satisfaction of his parents; An IT engineer was arrested at Pune’s Lohgaon airport with a fake visa and ticket CISF Jawan Viman Nagar Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Indian Railway | IRCTC ची ‘पुशअप’ सुविधा ! 30 टक्के रेल्वे प्रवासी घेताहेत याचा ‘लाभ’

 

Monalisa | मोनालिसाच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, व्हायरल झाले फोटो

 

Pune News | शुभांगी बनसोड यांचे दु:खद निधन