Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेसोबत 6 वर्षे शारिरीक सबंध ठेवून लग्नाचे आमिष (Marriage Lure) दाखवले. त्यानंतर महिलेचा छळ करुन 20 वर्षाच्या मुलीसोबत लग्न लावून देण्यासाठी तगादा लावला. तसेच मुलीसोबत लग्न लावू दिले नाहीतर जीवाचे बरेवाईट (Pune Crime) करुन घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला वानवडी पोलिसांनी बाड्या (Arrest) ठोकल्या आहेत.
नासीर सलाम सौदागर Nasir Salam Saudagar (वय 30, रा. संविधान चौकाजवळ, वानवडी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड (Marketyard) येथील एका 40 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून ऑक्टोबर 2015 पासून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले.
त्यानंतर फिर्यादी सोबत लग्न न करता फिर्यादी यांची 20 वर्षाची मुलीसोबत लग्न लावून देण्यासाठी फिर्यादीचा मानसिक छळ केला.
फिर्यादीची फसवणूक (Cheating) करुन फिर्यादीचे मुलीबरोबर लग्न लावून दिले नाही तर त्याच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी (Threat) त्याने फिर्यादी यांना दिली.
या छळाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन वानवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Web Title :- Pune Crime | He had physical relations with his mother by showing the lure of marriage and threatened to marry his daughter
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update