Pune Crime | पुण्यात विमानाने यायचे आणि चोरी करुन परत जायचे, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा (Pune Police Crime Branch unit-4) युनिट चारच्या पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक (Arrest) केली आहे. हे चोरटे उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) चोरी (theft) करण्यासाठी चक्क विमानाने (aeroplane) पुणे शहरात (Pune Crime) येत होते आणि चोरी केल्यानंतर तात्काळ पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशात जात होते. पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील 6 लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

परवेज शेर मोहम्मद खान (वय -43 रा.एस.पी.जी. गल्ली नं.2 जवळ, सुरजपूर, देवला, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश), तस्लीम आरिफ समशुल खान (वय-23 रा. मु.पो. धुमरी, ता. अलीगंज, जी. ऐटा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. परवेश खान याच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) 9 तर तस्लीम खान याच्यावर दिल्ली (Delhi) येथे 3 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीतील दोन घरफोडीचे (Burglary) गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यातील 6 लाख 37 हजार रुपये किमतीचे 130 ग्रॅम सोने (Gold) जप्त केले आहे. (Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट चार चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दोन संशयित लोहगाव (lohegaon) येथील 509 चौकात थांबले असून त्यांनी विश्रांतवाडी आणि धानोरी (Dhanori) परिसरात घरफोड्या केल्याची माहिती पोलिस अंमलदार राकेश खुणवे आणि अशोक शेलार यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी वानवडी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.

अशी करत होते चोरी
आरोपी परवेज खान हा कपडे विक्री करतो. दोघेही सराईत गुन्हेगार असून ते वॉचमन नसलेल्या सोसायटीची रेकी करत होते. ज्या ठिकाणी वॉचमन नाही त्या इमारतीत ते चोरी करत होते. चोरी करण्यासाठी उत्तर प्रदेशातून विमानाने पुण्यात येत होते. चोरी केल्यानंतर लगेच पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशला निघून जात होते.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar)
यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaydeep Patil), महेंद्र पवार, राजस शेख,
राकेश खुणवे, संजय आढारी, प्रविण भालचिम, विशाल शिर्के, दत्ता फुलसुंदर, अशोक शेलार, रमेश राठोड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | He used to come to Pune by plane and steal back and forth, arrested by the pune police crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा केवळ 400 रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळेल 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम

Online Payment New Rule | 1 जानेवारीपासून ऑनलाइन पेमेंटचे नियम बदलणार, ‘हे’ नक्कीच तुम्हाला माहिती असायला हवं

 

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला; म्हणाले – ‘स्वतःची किंमत वाढवण्यासाठी अजित पवारांवर टीका’