Pune Crime | कॅनडात नोकरी लागल्याचे सांगून तो पुण्याच्या लोहगाव विमानतळात शिरला अन् गेला पकडला; बनावट व्हिसा, विमान तिकीट बनविणारा तरुण अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नोकरी गेल्याने त्याला अमेरिकेहून (united states of america) घरी यावे लागले होते. आई वडिलांना दाखविण्यासाठी त्याने कॅनडात (canada) नोकरी लागल्याचे सांगितले. बनावट तिकीट व व्हिसाही (Fake Visa) तयार केला. आपण खरेच कॅनडाला जात असल्याचे दाखविण्यासाठी त्याने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर (lohegaon airport pune) प्रवेशही केला. तेथून बाहेर पडत असताना सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्याने तो अडकला. बनावट तिकीट (Fake Air Ticket) व कॅनडाचा बनावट व्हिसा तर करुन त्याचा गैरवापर करणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाला विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) अटक (Pune Crime) केली आहे.

 

याप्रकरणी लोहगाव विमानतळावरील (lohegaon airport) शिफ्ट इन्चार्ज अरविंदकुमार सिंग यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध (Aundh News) येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाची २०१९ मध्ये नोकरी गेली. त्यामुळे त्याला अमेरिकेहून परत पुण्याला यावे लागले होते. त्यानंतर काही महिन्यातच लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे त्याला कोठेही नोकरी न मिळाल्याने गेली २ वर्षे तो घरीच होता. आपण आई वडिलांवर बोझ बनलो आहोत, अशी बोच त्याच्या मनात लागून राहिली होती. त्यामुळे त्याने घरी कॉम्प्युटरवर कॅनडाचा बनावट व्हिसा तयार केला. तसेच पुणे ते दिल्ली व दिल्ली ते व्हॅनकुवर (कॅनडा) असे एअर इंडियाचे बनावट तिकीटही तयार केले.

आपल्या आईवडिलांना त्याने आपल्याला नोकरी लागल्याचे व आपण कॅनडाला जात असल्याचे सांगितले.
त्यामुळे आई वडिलांना आनंद झाला. ९ डिसेबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास या तरुणाचे आईवडिल त्याला सोडण्यासाठी विमानतळावर आले.
त्यामुळे त्याला विमानतळामध्ये प्रवेश करावा लागला. दुपारी साडेचार ते सायंकाळी सव्वासात वाजेपर्यंत तो विमानतळाच्या लॉबीतच थांबून राहिला.
त्यानंतर तो पुन्हा आत प्रवेश करतात, तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु (Pune Crime) लागला. तेव्हा सुरक्षा रक्षकांना संशयास्पद वाटले.
त्यांनी चौकशी केल्यावर त्याच्याकडील तिकीट व व्हिसा बनावट (Fake Visa) निघाला. त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक पाठक (API Pathak) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | He was arrested at Pune’s Lohgaon airport on the pretext of getting a job in Canada; Young man arrested for making fake visa, plane ticket

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nora Fatehi Oops Moment | कारमधून उतरताना नोरा फतेहीचा टॉप आला खाली, झाली Oops Moment ची शिकार…!

Pune Crime | कोथरूड परिसरातील सुतारदर्‍यात तरूणावर वार करून खुनाचा प्रयत्न; गणेश मांझीरे, समीर पडवळ, रोहित ढोकणेविरूध्द FIR

Kolhapur Crime | धक्कादायक ! 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीनं राहत्या घरात घेतला गळफास