Pune Crime | ‘राईड’ मारायला गेला तो परतलाच नाही; थेट शोरुममधून लाखाची मोटारसायकल घेऊन ठोकली धूम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दुचाकी घेण्यासाठी तो शोरुमला आला. त्याने एक मोटारसायकल पसंतही केली. त्यानंतर त्याने तेथील कर्मचार्‍यास गाडीची टेस्ट राइड मारुन परत येतो, असे सांगून गाडी घेऊन गेला. तो पुन्हा परतलाच नाही. शेवटी मोटारसायकलच्या वितरकाने पोलिसांकडे (Pune Crime) धाव घेतली.

सागर शिंदे असे नाव सांगणार्‍यावर स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शंकर शेठ रोडवरील (Shankar Seth Road, Pune) कोठारी हुंडाई शोरुममध्ये शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शोरुमच्या वतीने दर्शन मेहता यांनी फिर्याद दिली आहे. सागर शिंदे असे नाव सांगणारा एक तरुण शोरुममध्ये आला होता. त्याने एक लाख रुपयांची केटीएम मोटारसायकल विकत घ्यायची असल्याचे सांगितले. त्यानंतर गाडीची टेस्ट राइड मारुन परत येतो, असे म्हणून त्याने गाडी घेतली. त्यानंतर तो परत न येता, गाडीचा अपहार करुन फसवणूक (Cheating Case, Pune) केली. गुन्ह्याचा अधिक तपास स्वागरेट पोलिस (Pune Crime) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | He went on a ride and never returned; Dhoom hit a motorcycle worth lakhs directly from the showroom-shankar seth road pune swargate police station marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

KCR Government | ‘या’ राज्याकडून मोदी सरकारच्या विरुद्ध कृषी कायद्यांबद्दल लढताना प्राण गमावलेल्या 750 शेतकऱ्यांना 3 लाखांची मदत; ‘केसीआर’ यांनी बळीराजाचं ‘मन’ जिंकलं

Pune Crime | अत्यंत दुर्दैवी ! बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून करणाऱ्या भावाचाही मृत्य; पुणे जिल्ह्यातील घटना

Preity Zinta | आई बनल्यानंतर अभिनेत्री प्रिती झिंटा करणार बाॅलिवूडमध्ये ‘कमबॅक’; या रोलमध्ये दिसणार

Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळुन पतीची आत्महत्या; 5 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी