Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, शिक्षकांसह 5 जणांना अटक; आतापर्यंत 11 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राज्य आरोग्य विभागाच्यावतीने (State Health Department) आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून (Health Department Recruitment Paper Leak Case Pune) त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस (Pune Cyber Police) करत असून या प्रकरणात पोलिसांनी (Pune Crime) आणखी पाच जणांना अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लातूर सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर आणि शिक्षकांचा समावेश आहे. आजपर्यंत या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

सार्वजनिक आरोग्य विभागातील (Public Health Department) मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे Chief Administrative Officer Prashant Venkatrao Badgire (वय 50, रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, जि. बीड) डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड Dr. Sandeep Trimbakrao Jogdand (वय 36, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, जि. बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे Uddhav Pralhad Nagargoje (वय 36, रा. तितरवणे, ता. शिरूर कासार, जि. बीड), शाम महादू म्हस्के Sham Mahadu Mhaske (वय 38 ,रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप Rajendra Pandurang Sanap (वय 51, रा. शामनगर, जि. बीड) यांना अटक करण्यात आली. यापूर्वी अनिल गायकवाड, विजय मुऱ्हाडे, प्रकाश मिसाळ, संदीप भुतेकर, बबन मुंढे, सुरेश जगताप यांना अटक केली आहे, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेच्या (Cyber Crime Branch) पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांनी दिली. (Pune Crime)

 

याप्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर (Smita Karegaonkar) यांनी पुणे सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पेपर फुट प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे आज (मंगळवार) पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके (Senior Police Inspector D. S. Hake),
उपनिरीक्षक अमोल वाघमारे (PSI Amol Waghmare), संदेश कर्णे, नवनाथ जाधव, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार आदींनी कारवाई केली.

 

प्रशांत बडगिरे सूत्रधार

लातूर विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे.
त्याने प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात अंबेजोगाई येथील मनोरुग्णालयातील डॉ. जोगदंड यांच्याकडून 10 लाख आणि शाम म्हस्के
यांच्याकडून 5 लाख रुपये घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
बडगिरे याने ही प्रश्नपत्रिका कोठून मिळवली याचा तपास पुणे सायबर पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Health department arrested 5 persons including Chief Administrative Officer, doctors and teachers in Paper Footy case; So far 11 people have been arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Samantha Prabhu | घटस्फोटावर समंथाने सोडलं मौन, म्हणाली – ‘मी सगळ सहन केलं, पण गर्भपात, अफेअर…’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 49 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Shani Sadesati 2022 | लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार ‘शनि’; ‘या’ राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी, जाणून घ्या