क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात नौदलातील खलाशी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी 31 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून (Health Department Recruitment Fraud Case) त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस (Pune Cyber Police) करत असून या प्रकरणात पोलिसांनी प्रकरणात नेव्हल डॉकयार्डमध्ये (नौदल) (Naval Dockyard) खलाशी (Sailor) म्हणून कार्यरत असलेल्या एकाला अटक केली आहे. तो आरोपींच्या संपर्कात असल्याचे निर्दर्शनास आले आहे.

 

प्रकाश दिगंबर मिसाळ Prakash Digambar Misal (वय-40 रा. वराळे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असतान न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर (Smita Karegaonkar) यांनी पुणे सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणात यापूर्वी विजय प्रल्हाद मुर्‍हाडे (वय-29, रा. नांदी, ता. अंबड, जि. जालना), सुरेश रमेश जगताप (वय 28, रा. बोल्हेगाव, ता घनसांगावी, जि. जालना), संदिप शामराव भुतेकर (वय 38, रा. सातारा परिसर, औरंगाबाद), अनिल दगडू गायकवाड (वय 31, रा. किनगांववाडी, ता. अंबड), बबन बाजीराव मुंढे (वय 48, रा. पळसखेड झालटा, ता. देउळगाव राजा, जि. बुलढाणा) आणि  यांना अटक करण्यात आलेली आहे.

 

अटक करण्यात आलेल्या प्रकाश मिसाळ याचा मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे. त्याने आणखी कोणाला पेपर पाठवला आहे का? याचा तपास करणे. तसेच मिसाळ याला पेपर पुरवणारा आरोपी याचाही माहिती मिळवायची आहे. अटक आरोपीने पेपर मिळवण्यासाठी तसेच पेपरचे वितरण करण्यासाठी इतर कोणत्या साथीदाराच्या संपर्कात होता त्याचे शोध घेणे, आरोपीकडून मूळ हस्तलिखित प्रश्नोत्तर स्वरुपातील पेपर हस्तगत करुन त्या प्रमाणे हस्ताक्षरांचे नमूने घेयचे असल्याचा युक्तीवाद सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव (Assistant Public Prosecutor Vijay Singh Jadhav) यांनी करुन न्यायालयाकडे आरोपीची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुतेकर हा निवृत्त जवान आहे. तो 2019 मध्ये लष्करातून निवृत्त झाला आहे. तो औरंगाबाद येथे सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण देणारी नवस्वराज्य (Navaswarajya) नावाने करिअर ॲकडमी (Career Academy) चालवितो. तर मिसाळ हा डॉकयार्ड येथे खलाशी आहे. मिसाळ याचा एक नातेवाईक बीडमध्ये शिक्षक आहे. त्याच्याकडून मिसाळ याला पेपर मिळाला होता. (Pune Crime)

 

मिसाळ याने तो तीन एजंटांना व भुतेकर याला दिला होता.
दोघांनी त्यांच्याकडील उमेदवारांना सकाळी सहा वाजता बोलवून 92 प्रश्न व त्याची उत्तरे सांगत ती पाठ करून घेतली होती.
मिसाळ याने एजंटामार्फत चाकण परिसरात 30 उमेदवारांना बोलवून उत्तरे सांगितली.
तर भुतेकर याने 23 विद्यार्थ्यांकडून उत्तरे पाठ करून घेतल्याचे समोर आले आहे.
मिसाळ याला मदत करणारे दोन एजंट अद्याप फरार आहेत.

 

Web Title :- 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Supreme Court | कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली नाही? महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 518 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Shivsena | शिवसेना यूपीएत सहभागी होणार? संजय राऊत घेणार राहुल-प्रियंका यांची भेट

Back to top button