क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Crime | आरोग्य विभाग भरतीचा पेपर मुंबईतूनच फुटल्याचं उघड ! पुणे पोलिसांनी आरोग्य संचालनालयातूनच घेतलं सह संचालकाला ताब्यात, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनालाइन – Pune Crime | आरोग्य विभागाच्या (Maharashtra Health Department) पेपर फुटी प्रकरणात (health department paper leak case) लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक केली असताना या प्रकरणाचे मुंबई कनेक्शन (Mumbai connection) उघडकीस आले आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात आरोग्य संचालनालयातील सह संचालक महेश बोटले (health department joint director mahesh botle) याला पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) ताब्यात (Arrest) घेतले आहे. या अधिकाऱ्याकडूनच हा पेपर फुटल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात यापूर्वी 11 जाणांना अटक (Pune Crime) करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुण्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी दिली आहे.

 

मुंबईतील आरोग्य विभागातील (Health Department in Mumbai) सह संचालक महेश बोटले (Mahesh Botle) असे ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी बटोले याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. बोटले यांच्याकडे सह संचालक पदाचा अतिरिक्त कार्याभार असून ते मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत. पेपर फुटी प्रकरणात महेश बोटले (health department paper leak case mahesh botle) यांचा सहभाग आढळून आल्याने पुणे पोलिसांनी (Pune Police) त्यांना ताब्यात घेतले आहे. बटोले हे या समितीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Pune Crime)

 

प्रशांत बडगिरे (Prashant Badgire) याला मंगळवारी अटक केल्यानंतर सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांनी त्याची चौकशी केली. त्यातून या पेपरफुटीसंबंधी अनेक बाबी पुढे आल्या आहेत. त्यातूनच बडगिरे याने महेश बोटले याच्याकडून पेपर मिळाल्याची माहिती दिली. (Pune Crime)

याप्रकरणी सह संचालक महेश बोटले याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लातूर येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे (Latur Public Health Department Chief Administrative Officer Prashant Badgire) याने आपल्याला बोटले याच्याकडून पेपर मिळाला असल्याची कबुली दिल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

 

आतापर्यंत 12 जणांना अटक
सार्वजनिक आरोग्य विभागातील (Public Health Department) मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय 50, रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, जि. बीड) डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय 36, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, जि. बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय 36, रा. तितरवणे, ता. शिरूर कासार, जि. बीड), शाम महादू म्हस्के (वय 38 ,रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (वय 51, रा. शामनगर, जि. बीड) यांना मंगळवारी (दि.7) अटक केली. यापूर्वी अनिल गायकवाड, विजय मुऱ्हाडे, प्रकाश मिसाळ, संदीप भुतेकर, बबन मुंढे, सुरेश जगताप यांना अटक केली आहे, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेच्या (Cyber Crime Branch) पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांनी दिली.

आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर (Smita Karegaonkar) यांनी पुणे सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पेपर फुट प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे आज (मंगळवार) पाच जणांना अटक केली. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या 12 झाली आहे.

 

प्रशांत बडगिरे सूत्रधार?
बडगिरे याने आपल्याला 15 लाख मिळाल्याचे अगोदर सांगितले होते.
मात्र, अधिक चौकशीत त्याने आपल्याला 33 लाख मिळाल्याची कबुली दिली आहे.
बडगिरे याने ज्यांच्याकडून पैसे घेऊन पेपर पुरविला.
त्यांनी तो पुढे अनेक एजंट, क्लास चालकांना पुरवून त्यातून आतापर्यंत 80 लाख रुपये उकळल्याचे पुढे आले आहे.
ही लिंक आणखी पुढे गेली असण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Pune Crime | Health department recruitment paper leaked from Mumbai! Pune police took the joint director Mahesh Botle from the health directorate and arrested him

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Army Helicopter Crash | तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे भारतावर शोककळा ! ‘शौर्य’ चक्राने सन्मानित कॅप्टन वरुण सिंह बचावले, हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाची लढाई

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘ही’ योजना 2024 पर्यंत सुरू राहणार; जाणून घ्या कोणाला होणार फायदा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Back to top button