Pune Crime | ‘गुप्ता’ व ‘गाडा’ बिल्डरशी संगनमत करुन जागा बळकाविण्यास ‘मदत’; पुणे ‘महापालिका’, हवेलीच्या ‘भूमि अभिलेखा’च्या ‘त्या’ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात (supreme court) दावा प्रलंबित असताना भूमि अभिलेखा कार्यालयातील (Land Records Office) अधिकार्‍यांनी जमिनीची मोजणी करुन दिली तसेच महापालिका अधिकार्‍यांनी (PMC Officers) त्यावर मंत्रा 29 गोल्ड कोस्ट डेव्हलपर्स एलएलपी (mantra 29 gold coast developers llp in dhanori) या प्रकल्पचा प्लॅन पास करुन दिल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) बांधकाम व्यवसायिकासह महापालिका अधिकारी व भूमि अभिलेखा अधिकार्‍यांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

या प्रकरणी विशाल सत्यवान खंडागळे Vishal Satyavan Khandagale (वय ३५, रा. रामवाडी, नगर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन रोहीत घनश्याम गुप्ता Rohit Ghanshyam Gupta (वय ६०), मुकेश घनश्याम गुप्ता Mukesh Ghanshyam Gupta (वय ५५), किशोर पोपटलाल गाडा Kishore Popatlal Gada (वय ४५), निलेश पोपटलाल गाडा Nilesh Popatlal Gada (वय ४०, सर्व रा. मेट्रोपोल, बंडगार्डन रोड) तसेच पुणे महानगर पालिका व भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट २००९ ते ४ मे २०२१ दरम्यान घडला आहे. पुणे महानगरपालिका आणि हवेलीच्या भुमी अभिलेख अधिक्षक कार्यालयातील अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप त्यांची नावे निष्पन्न झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल खंडागळे यांच्या बहिवाटीची सर्व्हे नं २९ मधील एकूण क्षेत्र १५ हजार १०० स्क्वेअर मीटर पैकी प्लॉट नं. १६, २० आणि २१ क्षेत्र, ९ आर (गुंठे) या जागेची मंत्रा २९ गोल्ड कोस्ट डेव्हलपर्स एलएलपी चे (mantra 29 gold coast developers llp in dhanori) ) भागीदार गुप्ता व इतरांनी येरवडा येथील भुमी अभिलेख कार्यालयात (Land Records Office, Yerwada) खोटी माहिती देऊन सर्व्हे नं. २९ ची मोजणी करुन घेतली. या मिळकतीवर सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असतानाही पुणे महानगरपालिका (Pune Corporation) व भुमी अभिलेख अधीक्षक कार्यालय, हवेली येथील अधिकार्‍याशी संगनमत करुन मंत्रा २९ गोल्ड कोस्ट हा प्रकल्पाचा प्लॅन पास करुन घेतला. फिर्यादी यांची सर्व्हे नं. २९ मधील १५ हजार ९०० स्क्वेअर मीटरपैकी प्लॉट नं. १६, २० आणि २१ क्षेत्र ९ आर (गुंठे) धानोरी येथील जागा त्यांची आहे, असे भासवून ती बळकावून फसवणूक केली असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सातपुते अधिक तपास करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | ‘Help’ to grab space by colluding with ‘Gupta’ and ‘Gada’ builders; A case has been registered against ‘those’ officials of ‘Municipal Corporation’, ‘Land Records’ of Haveli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | काँग्रेसच्या माजी आमदाराची BJP वर टीका, मोहन जोशी म्हणाले – ‘मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला अपयश’

Vijay Rupani | … म्हणून विजय रूपाणींना गमवावे लागले मुख्यमंत्रीपद; PM मोदींच्या कार्यक्रमातही होते उपस्थित  

Pune Crime | पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना गुन्हे शाखेकडून अटक, 32 लाखाचा मुद्देमाल जप्त