Pune Crime | बहीण निघून गेल्याने तिच्या कंपनीमालकाला बेदम मारहाण, आंबेगाव बुद्रुक आणि वारजे माळवाडीतील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बहीण घरातून निघून गेल्याने ती काम करीत असलेल्या कंपनी मालकाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी २३ वर्षाच्या एका तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४९/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम पवार (रा. लेक व्ह्यु सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) व त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वारजे तसेच आंबेगाव येथील लेक व्ह्यु सोसायटीत ११ सप्टेबर रोजी मध्यरात्री साडेबारा ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीची बहीण फिर्यादीच्या कंपनीत कामाला आहे. ती ८ सप्टेबर रोजी घरातून कोठे तरी निघून गेली.
ती निघून जाण्यामागे फिर्यादीवर संशय घेऊन पवार याने फिर्यादी याच्याशी गोड बोलून त्याला मध्यरात्री मोटारसायकलवरुन घेऊन लेक व्ह्यु सोसायटीत आणले. तेथे कोयत्याने हातावर मारुन गंभीर जखमी केले. त्याच्या इतर तीन मित्रांनी पट्ट्याने व हातापायाने मारहाण केली. शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या मोबाईल फोन काढून घेतला. फिर्यादी याने सुटका करुन घेऊन उपचार केल्यानंतर आता फिर्यादी दिली असून पोलीस उपनिरीक्षक पडवळ तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Her company owner was brutally beaten as sister left, Ambegaon Budruk and Warje Malwadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Kisan Yojana | पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत आली नवीन अपडेट, कधी येणार तुमच्या खात्यात पैसे?

Pune Crime | अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशनशीप मिळवून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला 10 लाखांना गंडा

Flying Bike Video | स्वप्न नाही सत्य, ही आहे जगातील पहिली उडणारी बाईक, टॉप स्पीड- 100 kph