Pune Crime | वडिलांच्या बनावट मृत्यूपत्र प्रकरणात वकील मुलासह इतरांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर, पुण्यातील पर्वती येथील प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वडिलांच्या मृत्युपत्राबाबत मुलाने संशय व्यक्त करुन पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) वकील भावासह इतरांवर गुन्हा (FIR) दाखल केला (Pune Crime) होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन (Anticipatory bail) मिळावा यासाठी वकील मुलाने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. न्यायालयाने वकील मुलासाह इतरांना अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.

अ‍ॅड. परीक्षित देविदास बडे (Adv. Parikshit Devidas Bade),अमित रतिलाल कदम Amit Ratilal Kadam (रा. 60/2 लक्ष्मीनगर, पर्वती), देविदास दीपक तिकोणे Devidas Deepak Tikone (रा. 91/762 लक्ष्मीनगर, पर्वती), अ‍ॅड. दिलीप पारेख Adv. Dilip Parekh (रा. शुक्रवार पेठ, अ‍ॅड. विजय रतन आवताडे Adv. Vijay Ratan Awatade (रा. घोरपडी पेठ) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. यापूर्वी यातील डॉ. परितोष गंगवाल (Dr. Paritosh Gangwal) यांना उच्च न्यायालयाने जामीन केला होता. (Pune Crime)

पर्वती येथील कै. देविदास शंकर बडे (Devidas Shankar Bade) यांचे 18 डिसेंबर 2018 चे मृत्यूपत्र 24 डिसेंबर 2018 रोजी नोटरी करण्यात आले होते. अ‍ॅड. परीक्षित बडे यांनी पुण्याच्या दिवाणी न्यायालयात Civil Court (वरिष्ठ स्तर) वडिलांचे प्रोबेट मिळण्यासाठी 25 मार्च 2021 रोजी प्रकरण दाखल केले. तर देविदास बडे यांचा दुसरा मुलगा सत्यजित बडे (Satyajit Bade) यांनी 18 एप्रिल 2022 रोजी भाऊ परीक्षित बडे याच्यासह पाच जणांवर वडिलांच्या मृत्यूपत्राबाबात संशय व्यक्त करुन तक्रार दिली होती. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अ‍ॅड. परीक्षीत बडे यांच्यासह इतरांनी न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कै. देविदास शंकर बडे यांचे मृत्यूपत्र (Obituary) हे खरे की खोटे हे ठरवण्याचा
अधिकार दिवाणी न्यायालयाला असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
तसेच हे प्रकरण दिवाणी स्वरुपाचे असल्याने मृत्यपत्र बनावट म्हणता येणार नाही.
त्यामुळी सहा जणांनी हा गुन्हा केला असे म्हणता येणार नाही,
असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. अ‍ॅड. परीक्षित बडे व इतरांच्या वतीने सिनिअर कौन्सिल अ‍ॅड. मनोज मोहिते
(Senior Counsel Adv. Manoj Mohite), अ‍ॅड. संदीप बोरकर (Adv. Sandeep Borkar)
आणि अ‍ॅड. विवेक राणे (Adv. Vivek Rane) यांनी कामकाज पाहिले.

Web Title :- Pune Crime | High court grants anticipatory bail to lawyer son and others in father’s forged will case, Parvati case in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा