Pune Crime | ‘त्या’ गोळीबार प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून दिलासा; तपासाला 9 सप्टेंबर पर्यंत स्थगिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुंढवा पोलीस ठाण्यात (mundhwa police station) दाखल असलेल्या गुन्ह्यात (Crime) अमोल चव्हाण (Amol Chavan) आणि इतरांवर मोक्कानुसार कारवाई केल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) या गुन्ह्याचा पुढील तपासाला ‘स्टे’ दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मोक्का तपासाल 9 सप्टेंबर पर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच अमोल चव्हाण याला 9 सप्टेंबर पर्यंत अटक न करण्याचे आदेश पुणे पोलिसांना (Pune) दिले आहेत. त्यामुळे आता पुणे पोलीस त्यांचे म्हणणे मांडणार आहे.

टोळीप्रमुख सचिन निवृत्ती पोटे Sachin Pote (वय ४०), दगडू भीमराव वैद्य (वय ३६, दोघे रा. जोशी वाडा, नवी पेठ, पूना हॉस्पिटलसमोर), अजय अनिल शिंदे Ajay Anil Shinde (वय ३६,रा. हंसा कॉटेज हाऊस, कल्याणीनगर, येरवडा), विठ्ठल महादेव शेलार (वय ३८,रा. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे), अजिंक्य राजाराम पायगुडे (वय २८,रा. मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे), अनुप अशोक कांबळे (वय ३६, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा), अतिक इस्माइल शेख (वय ३३, रा. वडगाव शेरी), हेमंत मारूती कानगुडे (वय ३५, रा. खिलारेवाडी, एरंडवणे), अंकुश धारू निवेकर (वय २६, रा. भीमनगर, पौड फाटा), अमोल सतीश चव्हाण amol satish chavan(वय ३१, रा. बुधवार पेठ, बेलबाग चौक) यांच्यावर हा मोक्का लावलेला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात (mundhwa police station) गुन्हा दाखल आहे.

दोन वर्षांपूर्वी मुंढव्यातील टिकी लाऊंज पबमध्ये (WaiKiKi Tiki Bar Pune) दाम्पत्य वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. त्यावेळी पोटे व काहीजणांमध्ये वाद झाले होते. या वादातून सचिन पोटेने (Sachin Pote) पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र, दहशतीमुळे त्यांनी तक्रार दिली नव्हती. त्यानंतर ऑनलाइन बेटींग (online betting) प्रकरणात एकाकडून खंडणी वसूल (extortion) प्रकरणात पोटेविरोधात गुन्हा दाखल झाला.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दरम्यान, आरोपी अमोल सतीश चव्हाण (वय-31 रा. चव्हाणवाडा, कोथरुड) याने उच्च न्यायालयात दाद मागितली. यावर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि एन. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
ही घटना 2018 मधील असून त्यावेळेस फक्त तोडफोडीची तक्रार दाखल करण्यात आली होती.
आता फिर्यादी यांनी 2021 मध्ये गोळीबाराची फिर्याद दिल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. आरोपी तर्फे अ‍ॅड. अभिषेक अवचट (Adv. Abhishek Avachat), अ‍ॅड. सिद्धांत मालेगांवकर (Adv. Siddhant Malegaonkar) व अ‍ॅड. अभिजीत खांडरे (Adv. Abhijeet Khandre) यांनी मुंबई उच्च न्यायालयात युक्तीवाद केला.

Web Title :- Pune Crime | High Court grants relief to accused in mundhwa’s WaiKiKi Tiki Bar firing case, Postponement of investigation till 9th ​​September

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

Poonam Pandey | पूनम पांडेने देखील राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; Video व्हायरल

Post Office News | 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी ! अनेक पदांसाठी भरती अन् 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या