Pune Crime | ‘हायप्रोफाईल’ घरफोडी करणारे ‘बंटी-बबली’ अलंकार पोलिसांच्या जाळ्यात, 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अलंकार पोलीस ठाण्याच्या (Alankar Police Station) हद्दीत चोरी करणाऱ्या हायप्रोफाईल बंटी-बबलीच्या जोडीला पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल 1 कोटी 13 लाख 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध घेऊन त्यांना (Pune Crime) बेड्या ठोकल्या आहेत.

 

राजू दुर्योधन काळमेध Raju Duryodhana Kalamedha (वय-45) आणि त्याचे मेव्हणी सोनिया श्रीराम पाटील Sonia Sriram Patil (वय-32 दोघे रा. एन.बी. पर्ल सोसायटी, क्रांतीनगर, वडगाव बु. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी राजु काळमेध हा हॉटेल व्यावसायिक (Hotel Professionals) आहे तर सोनिया ही बी.ए. एल.एल.बी (B.A. LL.B) चे शिक्षण घेत आहे. सोनिया मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला अटक केली.(Pune Crime)

 

अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तापले.दरम्यान आरोपी राजू दुर्योधन याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा त्याची साथीदार मेव्हणी सोनिया हिच्या मदतीने केल्याचे सांगितले. सोनिया चोरीचा मुद्देमाल घेऊन मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

सोनिया हिच्याकडून चोरीला गेले डायमंड (Diamond), सोन्याचे (Gold) व चांदीचे दागिने (Silver Jewellery), गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी व चारचाकी गाडी असा एकूण 1 कोटी 13 लाख 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींचे वडगाव, वाकड, नाशिक, शिर्डी या ठिकाणी फ्लॅट आहेत तर वाकड येथे हॉटेल आहे. तसेच नाशिक येथे फार्म हाऊस आणि पोल्ट्री व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad),
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (API Sunil Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे (Senior Police Inspector Rajendra Sahane),
पोलीस निरीक्षक संगीता पाटील (Police Inspector Sangeeta Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुर्यकांत सपताळे (PSI Suryakant Saptale),
अरविंद शिंदे (PSI Arvind Shinde), चव्हाण (PSI Chavan), सहायक पोलीस उपनिरिक्षक महेश निंबाळकर,
पोलीस अंमलदार नलिन येरुणकर, धिरज पवार, सागर केकाण, सोमेश्वर यादव, भानुदास चांदगुडे, आशिष राठोड,
हरिष गायकवाड, नितीन राऊत, तुकाराम येडे, शरद चव्हाण, शशीकांत सपताळ यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | ‘High profile’ house burglars ‘Bunty-bubbly’ Alankar in police net, 1 crore worth of valuables seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Radhakrishna Vikhe Patil | ‘भारत जोडो’ यात्रा नसून जत्रा आहे – राधाकृष्ण विखे पाटील

MP Sanjay Raut | ‘सत्यमेव जयते! टायगर इज बॅक’, संजय राऊतांच्या सुटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया, जणून घ्या कोण काय म्हणाले?

Supriya Sule | संजय राऊत यांच्या सुटकेने न्यायावरील आमचा विश्वास अढळ राहिला – सुप्रिया सुळे (VIDEO)