Pune Crime | अबब ! एकाच फ्लॅटवर 8 बँकांकडून व ‘फायनान्स’कडून काढले गृहकर्ज; प्रकाश खंडेलवाल अन् प्रियंका खंडेलवाल यांच्यासह तिघांविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गृहकर्ज घेतल्यानंतर (Home Loan) काही हप्ते भरल्यावर कर्जदारांनी हप्ते भरण्याचे (Loan Installment) बंद केले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर तो होऊ शकला नाही. तेव्हा एका फायनान्स कंपनीच्या (finance company) अधिकार्‍याने ज्या फ्लॅटवर कर्ज (Loan on Flat) घेतले. त्याला भेट दिली तर त्याला मोठा धक्का बसला. ज्या फ्लॅटवर त्याने गृहकर्ज दिले होते. त्यावर तब्बल इतर ७ सरकारी व खासगी, सहकारी बँकांकडून या अगोदरच कर्ज (fraud case) घेतले असल्याचे व त्या बँकांनी नोटीसा (Bank Notice) लावण्याचे आढळून आले. (Pune Crime)

 

याप्रकरणी जयदीप बिश्नोई (वय २६, रा. विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) प्रकाश देवेंद्र खंडेलवाल Prakash Devendra Khandelwal (वय ३८), प्रियंका प्रकाश खंडेलवाल Priyanka Prakash Khandelwal (वय ३५) आणि देवेंद्र नारायण खंडेलवाल Devendra Narayan Khandelwal (वय ६५, सर्व रा. विमाननगर – Viman Nagar) यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि प्रियंका खंडेलवाल यांनी विमाननगरमधील निको एन एक्स सोसायटीतील (Neci Nx Society) तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटवर ५५ लाख रुपयांचे आवास फाईनेसर्स लि. (awas finance limited) यांच्याकडून गृहकर्ज घेतले. २०१५ मध्ये त्यांनी हे कर्ज घेतले. त्यासाठी १९४ मासिक हफ्त्यात परतफेड करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यापैकी ५१.१७ मासिक हप्ते त्यांनी सुरळीत भरले. त्यानंतर आजतागायत कोठलीही रक्कम भरली नाही. फिर्यादी यांनी रक्कम का भरली नाही, याची चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते रहात असलेल्या घरी मिळून आले नाही.

त्यामुळे फिर्यादी हे गृहकर्जासाठी गहाण ठेवलेल्या निको एन एक्स सोसायटी येथे गेले.
तेथे जाऊन पाहणी केल्यावर त्या फ्लॅटवर कॅनरा बँक (Canara Bank), युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India),
कॉर्पोरेशन बँक (corporation bank), युनायटेड बँक ऑफ इंडिया (united bank of india), कॉसमॉस बँक (cosmos bank),
अ‍ॅक्सीस बँक (Axis Bank), PNB बँक इत्यादी बँकेचे या मालमत्तेवर कर्ज असल्याबाबतच्या नोटीस लावल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले.
बँकेचे हप्ते थकल्यानंतर आरोपीने आर्थिक गैर लाभापोटी फिर्यादी यांच्या आवास फाईनेसर्स कंपनीला खोटी माहिती देऊन
ही मालमत्ता गहाण असतानाही कंपनीची फसवणूक (Cheating Case) केली. न्यायालयाच्या आदेशानुसार (Court Order) विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.

 

Web Title :- Pune Crime | Home loans from 8 banks and Finance on the same flat; FIR against Prakash Khandelwal and Priyanka Khandelwal-fraud case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Home Loan Tips | ‘गृह कर्जा’संबंधी 10 महत्वाच्या गोष्टी ! ज्या जाणून घेतल्या पाहिजेत, अन्यथा कॅन्सल होऊ शकते तुमचे ‘लोन’ अ‍ॅप्लिकेशन

 

Tina Dutta | टिना दत्तानं ब्रालेट घालून वर केले हात, पोज देण्याच्या नादात झाली Oops Moment ची शिकार

 

Pune Crime | पुणे-नगर महामार्गाजवळील शिक्रापूरामध्ये तृतीयपंथीयाचा खून; पुणे ग्रामीण पोलिसांकडून 4 तासात ‘पर्दाफाश’; मर्डरचं कारण आलं समोर